मुंबई - वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे बिगुल वाजले, प्राचार्य पदांच्या भरतीवरील बंदी उठविली, प्राध्यापक भरतीचा अध्यादेश, तासिका तत्त्वावरील मानधन वाढविले हे महत्त्वाचे निर्णय ठरले.नव्या वर्षांत त्याची अंमलबजावणी कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोबतच शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा कणा असलेल्या अधिष्ठाता नियुक्ती प्रक्रियेची अंमलबजावणी, क्लस्टर विद्यापीठाची कार्यवाही, रूसाअंतर्गत महाविद्यालयांना दिले गेलेल्या अनुदानाचा योग्य वापर, तसेच मुंबई विद्यापीठातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उच्च शिक्षण विभागाच्या दृष्टीने २०१९ मध्ये महत्त्वाचे ठरतील.विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जागा भरण्याची अनुमती देण्यात आली. त्याचबरोबर, तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येसुद्धा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाºयांना दिलासा मिळाला आहे. प्राध्यापकांच्या ३,५८० जागा, शारीरिक शिक्षण संचालनालयातील १३९ जागा, ग्रंथपालांच्या १६३ जागा आणि प्रयोगशाळा सहायकांच्या ८६५ जागा अशी एकूण ४,७३८ पदे भरण्यात नवीन वर्षात भरण्यात येणार आहेत. नवीन महाराष्ट्र कायद्यानुसार विद्यापीठांना पूर्णवेळ अधिष्ठाता देण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी नवीन वर्षात कशी होतेय आणि केव्हा होतेय, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. सोबतच राज्य शासनाने उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाडीबी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले. मात्र, या पोर्टलचा फज्जा उडाल्याने, त्याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून डीबीटीसाठी स्वतंत्र अंडी योग्य यंत्रणा नवीन वर्षात सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मुंबई विद्यापीठ रँकिंगनुसार पोहोचले प्रथम क्रमांकावरक्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे, तर राज्यात मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे. एसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, तर दूरस्थ शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.एवढच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १५६ टक्क्यांनी संशोधन पेपर्स मध्ये वाढ झाली आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणीवर कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.विद्यापीठाकडून अद्यापही विद्यार्थ्यांची होणारी गैयसोय लक्षात घेता, प्रशासनाने आणि कुलगुरूंनी यात अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आणि सिनेट सदस्य व्यक्त करत आहेत.मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोईसुविधांसाठी अधिक प्रयत्न नवीन वर्षात करावेत. त्यांच्या हितासाठी सगळ्यांत आधी परीक्षा भवन नवीन इमारतीत स्थलांतरित करावे आणि दुसरे म्हणजे मादाम कामा मुलींच्या वसतिगृहाचे काम लवकर करून ते मुलांसाठी उपलब्ध करून द्यावे.- प्रदीप सावंत,सिनेट आणि व्यवस्थापन परिषद सदस्य.
उच्च शिक्षण विभागासाठी विद्यापीठात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 5:16 AM