Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 05:46 PM2021-03-21T17:46:42+5:302021-03-21T17:50:00+5:30

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना महापालिका आय़ुक्त इकबाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी केलेल्या विधानानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

there will be no lockdown no night curfew in Mumbai says Municipal Commissioner iqbal singh chahal | Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान

Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान

Next

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना महापालिका आय़ुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केलेल्या विधानानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी शहरात लॉकडाऊन किंवा नाइट कर्फ्यू लादण्याची कोणतीच गरज वाटत नाही, असा दावा इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. (No Lockdown No Night Curfew In Mumbai says Iqbal Singh Chahal)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दिवसाला २ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर राज्यातील रुग्णसंख्या दिवसाला तब्बल २५ हजारांच्या घरात वाढत आहे. त्यात मुंबईतील रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असताना चहल यांच्या विधानानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चहल यांनी 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

मुंबई उपनगरात कोरोना लसीकरणाची टक्केवारी अधिक

"मुंबईत आढळणाऱ्या कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक रुग्ण हे कोणतीही लक्षणं नसलेले रुग्ण आहेत आणि मृत्यूचा दरही अत्यंत कमी आहे. मुंबईत कोविडच्या चाचण्या आता दरदिवसाला २५ हजारांहून आता थेट ५० हजारांपर्यंत नेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात रुग्णांचे आकडे वाढू शकतात. मुंबईत दर दिवसाला किमान ६ हजार रुग्णही वाढू शकतात", असं इकबाल सिंग चहल म्हणाले. रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचंही ते पुढे म्हणाले. 

मुंबईत सध्या ९ हजार बेड्स रिकामी असून गेल्या ३६ दिवसांत एकूण ३८ हजार रुग्णांपैकी फक्त ९२ रुग्णांना ICU मध्ये दाखल करावं लागलं आहे. त्यामुळे परिस्थितीवर प्रशासनाचं संपूर्णपणे नियंत्रण असून शहरात नाइट कर्फ्यू किंवा लॉकडाऊनची गरज नाही, असं चहल यांनी स्पष्ट केलं आहे. 

गर्दी कराल तर खबरदार! दिसाल तिथं होणार अँटिजेन चाचणी, महापालिकेचं 'मिशन टेस्टिंग'

दरम्यान, चहल यांनी दिवसाला १ लाख लोकांचं कोरोना लसीकरण व्हावं आणि लसीकरण करणाऱ्या खासगी रुग्णालयांची संख्या आता ५९ वरुन वाढवून ८० करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत शहरातील समाजिक संस्थांनी लसीकरण मोहिमेला मदत करण्यासाठीचं आवाहनही चहल यांनी केलं आहे. सर्व रुग्णालयांना कोरोनासाठीचे बेड्स वाढविण्याचे आणि खासगी रुग्णालयांना कोरोनावरील उपचार कमीत कमी खर्चात करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही ते म्हणाले. 

मुंबईत ठिकठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट
मुंबई महापालिकेनं याआधीच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॅपिड अँटिजन टेस्ट सुरू करणार असल्याचं पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार शहरात विविध मॉल्सबाहेर, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, बाजाराची ठिकाणं येथे नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. 

Web Title: there will be no lockdown no night curfew in Mumbai says Municipal Commissioner iqbal singh chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.