'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 12:22 PM2020-06-03T12:22:04+5:302020-06-03T12:22:49+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संकटामागून संकट येत असल्याचं सांगितलं. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे.
मुंबई - कोरोनाच्या संकटासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी निसर्ग या चक्रीवादळासंदर्भात माहिती देत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोरोनाचं संकट संपायच्या आतच निसर्ग चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर येऊन ठेपलंय. गेल्या ३ महिन्यात कोरोनाविरुद्ध महाराष्ट्र लढत असताना, आता आणखी नवं संकट. त्यामुळे, आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळातच एवढ्या मोठ्या संकटांना मुख्यमंत्र्यांन तोंड द्यावं लागतंय, असे अभिनेता अर्षद वारसीनं म्हटलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संकटामागून संकट येत असल्याचं सांगितलं. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच संकटाशी सामना करण्याच्या प्रयत्नाचं अभिनेता अर्षद वारसीने कौतुक केलंय.
मुन्नाभाई एमबीबीएसमधील सर्किट म्हणजे अर्षद वारसीने ट्विट करुन उद्धव ठाकरेंना येणाऱ्या संकटांबाबत भाष्य केलं आहे. मला वाटत नाही, दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यांनी नुकताच आपल्या खुर्चीचा पदभार घेतला अन् जागितक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. मुंबई सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोना अन् आता निसर्ग चक्रीवादळाचा सामना या मुख्यमंत्र्यांना करावा लागत आहे.
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone...🤦♂️
— Arshad Warsi (@ArshadWarsi) June 3, 2020
दरम्यान, अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 0रिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचनाही केल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी स्वत: फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.