मुंबईत ९ व १० डिसेंबरला काही परिसरांमध्ये पाणी येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 04:05 PM2020-12-06T16:05:08+5:302020-12-06T16:05:36+5:30
No water in some areas in Mumbai : काही परिसरांत कमी दाबाने पाणी येणार
मुंबई : मुंबई महापालिकेने ९ व १० डिसेंबर रोजी सुमारे ४ किलोमीटर लांबीची व १८०० मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलविण्याचे काम हाती घेतले आहे. जुन्या जलवाहिनीच्या जागी नवीन जलवाहिनी टाकताना ती मोठ्या आकाराची म्हणजेच २४०० मिलीमीटर व्यासाची असणार आहे. जलवाहिनी कामासाठी एस विभागात काही परिसरांमध्ये ९ व १० डिसेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही. तर याच दोन दिवशी के पूर्व, एच पूर्व, एल व जी उत्तर या विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत डक लाईन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर, पासपोली गाव, मोरारजी नगर, गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर या परिसरांत पाणी येणार नाही.
९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी, विजय नगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कमी दाबाने पाणी येईल.
९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणी येईल. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, ९० फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन येथे कमी दाबाने पाणी येईल. धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग येथे कमी दाबाने पाणी येईल.