५० लाख वाहनांचे पार्किंग होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:23 AM2022-02-04T08:23:21+5:302022-02-04T08:23:43+5:30

१२ वाहनतळांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा आणि उमाडा या कंपन्याशी करार

There will be parking for 50 lakh vehicles | ५० लाख वाहनांचे पार्किंग होणार

५० लाख वाहनांचे पार्किंग होणार

Next

मुंबई : वाहनांच्या पार्किंगची कोंडी फोडण्यासाठी खासगी इमारतींमध्ये पार्किंगची सोय उपलब्ध करुन देण्याचा विचार सुरू आहे. त्यातून खासगी संकुलांनाही उत्पन्न मिळू शकते. येत्या काळात मुंबईत ५० लाख वाहनांंच्या पार्किंगची सोय करण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनही तयार करण्यात येणार आहे. पार्किंग प्राधिकरणामार्फत या सर्व योजना राबवल्या जाणार आहेत. 

मुंबईतील सगळ्यात मोठ्या पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरण तयार केले जात आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईत 
३० ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांचा वापर सुरु झाला आहे. यापैकी १२ वाहनतळांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा आणि उमाडा या कंपन्याशी करार करण्यात आला आहे. 

Web Title: There will be parking for 50 lakh vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.