कोळशापासून वीजनिर्मिती क्षमतेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:06+5:302021-07-29T04:07:06+5:30

मुंबई : वातावरणातील बदलांचे आपत्तीजनक परिणाम टाळण्यासाठी तापमानात होणारी वाढ रोखण्याचा स्पष्ट इशारा आधुनिक हवामान विज्ञानाने दिला आहे. परिणामी ...

There will be a planned reduction in power generation capacity from coal | कोळशापासून वीजनिर्मिती क्षमतेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने होणार घट

कोळशापासून वीजनिर्मिती क्षमतेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने होणार घट

Next

मुंबई : वातावरणातील बदलांचे आपत्तीजनक परिणाम टाळण्यासाठी तापमानात होणारी वाढ रोखण्याचा स्पष्ट इशारा आधुनिक हवामान विज्ञानाने दिला आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेला कार्बनपासून मुक्त करण्यात आणि पॅरिस कराराची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी वीजक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. याचअंतर्गत कोळशापासून वीजनिर्मिती क्षमतेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने घट केली जाणार असल्याची घोषणा टाटा पॉवरने केली असून, सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हला अनुसरून उत्सर्जनात घट करण्याची उद्धिष्ट्ये पूर्ण करण्याचे वचन टाटा पॉवरने घेतले आहे. २०५० पूर्वी शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्धिष्ट पूर्ण करण्याचे हे वचन आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवान आणि प्रभावी कृतींची आवश्यकता आहे. हवामानाविषयी कृतीच्या जागतिक कार्यक्रमाला मदत म्हणून एनर्जी मॉडेल्स डीकार्बनाईज करण्याचे परिवर्तन घडवून आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर म्हणूनच टाटा पॉवर काम करत आहे. उत्सर्जनात घट करण्याची उद्धिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी हरित ऊर्जा पोर्टफोलियोमध्ये वाढ करण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. उत्सर्जनामध्ये घट करण्याची शास्त्रावर आधारित उद्धिष्ट्ये आखण्यासाठी सक्षम करून खासगी क्षेत्रामध्ये हवामानाबाबत महत्त्वाकांक्षी सक्रियतेला वेग देणारा सदर उपक्रम आहे. सीडीपी (कार्बन डिस्क्लोजर प्रोजेक्ट), युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) यांच्या दरम्यान भागीदारीतून याची स्थापना करण्यात आली आहे.

Web Title: There will be a planned reduction in power generation capacity from coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.