दादर चौपाटीवर होणार व्ह्युविंग गॅलरी, पर्यटकांसाठी पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:17 AM2020-11-04T05:17:10+5:302020-11-04T05:17:38+5:30

Dadar : दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक आऊटफॉल जिथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे.

There will be a viewing gallery at Dadar Chowpatty, a boon for tourists | दादर चौपाटीवर होणार व्ह्युविंग गॅलरी, पर्यटकांसाठी पर्वणी

दादर चौपाटीवर होणार व्ह्युविंग गॅलरी, पर्यटकांसाठी पर्वणी

Next

मुंबई : मुंबईतील प्रमुख आकर्षणापैकी एक असलेल्या दादर चौपाटीवर लवकरच ‘व्ह्युविंग गॅलरी’ उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून जून २०२१ पर्यंत ही गॅलरी मुंबईकरांसाठी खुली होणार आहे. या गॅलरीत उभे राहून मुंबईकरांना समुद्राच्या भरती-आहोटी तसेच वरळीपासून वांद्रेपर्यंतचा समुद्रकिनारा पाहता येणार आहे. 
दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक आऊटफॉल जिथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. गिरण्या बंद असल्यामुळे हा आऊटफॉल वापरात नाही. हा  आऊटफॉल तुटलेल्या अवस्थेत असला तरी दादर चौपाटीवर येणारे लोक येथे बसतात. त्यामुळे दादर चौपाटीवर चैत्यभूमीच्या मागील बाजूस समुद्रकिनाऱ्यावर गॅलरी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात हे काम लांबणीवर पडले होते. यासाठी आवश्यक परवानगी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकतीच महापालिकेला दिली. या प्रकल्पासाठी तीन कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे.

चैत्यभूमीच्या मागच्या बाजूस होणार गॅलेरी
दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक आऊटफॉल जिथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. गिरण्या बंद असल्यामुळे हा आऊटफॉल वापरात नाही. हा  आऊटफॉल तुटलेल्या अवस्थेत असला तरी दादर चौपाटीवर येणारे लोक येथे बसतात. त्यामुळे दादर चौपाटीवर चैत्यभूमीच्या मागील बाजूस समुद्रकिनाऱ्यावर गॅलरी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Web Title: There will be a viewing gallery at Dadar Chowpatty, a boon for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई