Join us

'...म्हणून निवडणूका घ्यायला विलंब लागतोय'; एकनाथ शिंदेंनी यामागील महत्वाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 1:50 PM

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

मुंबई: उद्धव बाळासाहेब गटाचे मुंबईतील विक्रोळी विभागातील कन्नमवारनगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नसल्याने व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे उपेंद्र सावंत यांनी सांगितले. 

गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नसल्याने व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे उपेंद्र सावंत यांनी सांगितले. शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या आता ३३ झाली असून त्यातील २५ हे उबाठा गटाचे असल्याचे सांगितले. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपेंद्र सावंत यांनी स्पष्ट केले.  

एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी विरोधकांवर निशाणा साधला. निवडणूक घेण्याची हिंमत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, मात्र उबाठा गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. उलट कधीही निवडणुका लागल्या तर त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. विरोधकांनी एकत्र येऊन २०१४ आणि २०१९ साली आघाडी केली होती. मात्र तरीही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य झाले नव्हते, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारनिवडणूक