या कारणांमुळे रणबीर कपूर आणि बॉलिवूडच्या मस्तानीमध्ये झाला होता 'Breakup'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 04:00 PM2018-01-25T16:00:30+5:302018-01-25T16:27:10+5:30
बॉलिवूडमध्ये काही प्रेमप्रकरणे अशी आहेत कि, जी कधीच प्रेक्षकांच्या विस्मरणात जाणार नाहीत. त्या हिरो-हिरॉईनच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला कि, त्यांचे प्रेमसंबंधही लगेच प्रेक्षकांच्या लक्षात येतात.
मुंबई - बॉलिवूडमध्ये काही प्रेमप्रकरणे अशी आहेत कि, जी कधीच प्रेक्षकांच्या विस्मरणात जाणार नाहीत. त्या हिरो-हिरॉईनच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला कि, त्यांचे प्रेमसंबंधही लगेच प्रेक्षकांच्या लक्षात येतात. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर या जोडीला आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पद्मावत सिनेमामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण आज रणवीर सिंहबरोबर आनंदात असली तरी रणबीर कपूर बरोबरचे तिचे प्रेमप्रकरण एकेकाळी बरेच गाजले होते.
अलीकडेच दिपिकाने एका मुलाखतीत रणबीरबरोबर तिचे ब्रेकअप का झाले ? त्याचा खुलासा केला. ज्याच्यावर मी मनापासून मी प्रेम करते तो माणूस मला माझ्याशी प्रामाणिक असल्याचा विश्वास देत असेल तर माझ्या मनात असुरक्षिततेची भावना का येईल ? नात्यामध्ये आपलेपणा विश्वास असेल तर तो कुठे आहे ?, तो काय करतोय ? तो कोणाबरोबर आहे ? असे प्रश्न विचारण्याच्या फंदात मी पडणार नाही. माझा जोडीदार विश्वास तोडत असेल तर नक्कीच मी त्या नात्याबद्दल पझेसिव्ह होणार. जेव्हा काहीतरी चुकीचे घडतेय हे तुम्हाला माहित असते तेव्हाच तुम्ही पझेसिव्ह होता असे दीपिका म्हणाली.
दीपिका पादुकोण बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफचा प्रवेश झाला. दीपिका बरोबर रिलेशनशिपमध्ये असतानाच रणबीरच्या आयुष्यात कॅटरिनाचा प्रवेश झाला होता असे बोलले जाते. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. रणवीर आता सिंगल असून मध्यंतरी त्याचे नाव माहिरा खान बरोबर घेतले होते.