या चिमण्यांनो, परत फिरा रे...

By admin | Published: March 19, 2017 03:42 AM2017-03-19T03:42:25+5:302017-03-19T03:42:25+5:30

‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ म्हणून बाळाला भरवताना शहरांत ‘चिऊ’ची शोधाशोध करावी लागते. निरूपद्रवी छोटासा चिमणी हा पक्षी गेल्या काही वर्षांपासून काँक्रीटच्या

These sparrows, come back again ... | या चिमण्यांनो, परत फिरा रे...

या चिमण्यांनो, परत फिरा रे...

Next

मुंबई : ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ म्हणून बाळाला भरवताना शहरांत ‘चिऊ’ची शोधाशोध करावी लागते. निरूपद्रवी छोटासा चिमणी हा पक्षी गेल्या काही वर्षांपासून काँक्रीटच्या शहरांपासून लांब गेला आहे. शहराच्या प्रगतीसाठी शहरांमध्ये करण्यात आलेल्या बदलांचा परिणाम चिमण्यांच्या जीवनमानावर झाल्याने शहरातील चिमण्यांचे स्थलांतरणाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, चिमण्यांना शहरांमध्ये पुन्हा आणण्यासाठी काही पक्षिप्रेमींनी केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र तरीही चिमणी संवर्धनासाठी नियोजनबद्ध तळमळ हवी, असे पक्षिप्रेमींचे म्हणणे आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरात लोकसंख्या अधिक असली तरीही झाडांची संख्याही पुरेशा प्रमाणात होती. इमारती, चाळी होत्या. आता शहराचा चेहरा बदलत चालला आहे. अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होते. चाळी, इमारतींची जागा आता टोलेजंग टॉवर्सनी घेतली आहे.
माणसाचे जीवनमान उंचावत असताना पक्षी, प्राण्यांचे जीवनमान खालावत आहे. प्राणी, पक्षी संपत्ती नष्ट होऊ नये म्हणून पुढे येऊन एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतून लगतच्या भागात स्थलांतरित झालेल्या चिमण्या पुन्हा मुंबईत स्थलांतरित व्हाव्यात यासाठी काही साधे बदल करणे आवश्यक आहे.
झाडे तोडली जातात. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे सगळीकडे टॉवर्स उभे राहिले आहेत. त्यामुळे ‘मायक्रोव्हेव’ लहरींचा मारा सुरू झाला. वळचणीच्या जागा कमी झाल्या आहेत. ओढे, नाले नष्ट झाले आहेत. परिणामी चिमण्यांच्या प्रमाणात घट झाली असल्याचे पक्षिप्रेमी प्रमोद माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

अशा असतात चिमण्या
एक चिमणी एका वेळी तीन अंडी घालते. पुढील सहा महिन्यांनंतर पुन्हा तीन अंडी घालते. म्हणजेच एक चिमणी प्रतिवर्षी सहा चिमण्यांना जन्माला घालते.
नर चिमणीच्या मानेवर काळा ठिपका असतो, तर मादीच्या मानेवर नसतो.

चिमण्यांना अन्न, पाणी द्या
- मार्च महिन्यापासून सुरू होणारा उन्हाळा
जून महिन्याच्या मध्यापर्यंत सुरूच असतो.
- या वेळी चिमण्यांसह अन्य पक्ष्यांनाही अन्न, पाणी मिळत नाही. चिमण्यांना शहरात टिकवण्यासाठी खिडकीत, बाल्कनीमध्ये त्यांना अन्न ठेवा.

Web Title: These sparrows, come back again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.