Join us  

त्यांनी शरीरात लपवले होते तब्बल दीड किलो सोने- मुंबई विमानतळावर तिघांना अटक, सीमा शुल्क विभागाची कारवाई

By मनोज गडनीस | Published: February 01, 2024 5:52 PM

प्राप्त माहितीनुसार, बँकॉक येथून मुंबईत सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मुंबई - बँकॉक येथून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांनी आपल्या शरीरामध्ये तब्बल दीड किलो सोने लपवत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नांचा सीमा शुल्क विभागाने भांडाफोड करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८७ लाख रुपये आहे. प्राप्त माहितीनुसार, बँकॉक येथून मुंबईत सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. हुसेन भाटिया आणि बुराहुद्दीन कोटवाला या दोन व्यक्ती या विमानातून उतरल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना बाजूला घेत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या सामानात सोने आढळून आले नाही. मात्र, चौकशीअंती त्यांनी गुदद्वाराद्वारे शरीरात सोने लपविले असल्याची कबुली अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एक प्रकरणात, शारजा येथून आलेल्या एका प्रवाशाकडे सोन्याची पेस्ट आढळून आली. त्याचे वजन ५४९ ग्रॅम इतके असून त्याची किंमत ३४ लाख रुपये इतकी आहे. त्याने सोन्याच्या पेस्टचे हे पाकिट आपल्या अंतर्वस्त्रामध्ये लपवल्याचे आढळून आले. त्यालाही अटक करण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिससोनं