Join us

‘ते’ 10 विद्यार्थी परीक्षेला मुकणार

By admin | Published: December 10, 2014 1:59 AM

शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून प्रयत्न होत असले तरी ती पोहोचवणा:या ग्रामीण भागातील भावी शिक्षकांचीच घोर फसवणूक झाली आहे.

अजय महाडिक - मुंबई
शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून प्रयत्न होत असले तरी ती पोहोचवणा:या ग्रामीण भागातील भावी  शिक्षकांचीच घोर फसवणूक झाली आहे. रीतसर प्रवेशासाठी अर्ज व अव्वाच्या सव्वा फी भरून केवळ संस्थाचालकांच्या गलथान कारभारामुळे भिवंडी तालुक्यातील 1क् विद्याथ्र्यावर उद्यापासून सुरू होणा:या परीक्षेपासून वंचित राहण्याची नामुष्की आली आहे.
 भिवंडी तालुक्यातील खडिवली येथील साधना शिक्षक महाविद्यालयात हे फसवणुकीचे प्रकरण घडले आहे. याविरोधात मंगळवारी हे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात धडकले. मात्र परीक्षा विभागाने या प्रकरणी हात वर केले असून, साधना शिक्षक महाविद्यालयावर विद्याथ्र्याच्या फसवणुकीचे खापर फोडले आहे. या प्रकरणी विद्याथ्र्यानी परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदविली आहे. 
 साधना शिक्षक महाविद्यालयाने 1क्क् विद्यार्थी प्रवेशाची परवानगी असताना 122 विद्याथ्र्याचे ऑनलाइन फॉर्म भरले. त्यातील 11क् विद्याथ्र्याकडून रीतसर प्रवेश फीपेक्षा जास्त रकमा लाटल्या. विद्याथ्र्याना तुमचे प्रवेश निश्चित झाल्याचे सांगून अंधारात ठेवले.  परीक्षा उद्यावर ठेपली असताना तांत्रिक कारणांमुळे तुमचे अर्ज विद्यापीठाने बाद केले असून, तुम्हाला परीक्षेस बसता येणार नसल्याचे साधना शिक्षण संस्थेचे सचिव व माजी शिक्षण अधिकारी थोरात सर यांनी विद्याथ्र्याना सांगितले. मात्र विद्याथ्र्यानी विद्यापीठ गाठल्यावर महाविद्यालय व संस्थाचालकांनी आपली फसवणूक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 
..म्हणून वाढतोय घोळ
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, प्रवेश निश्चिती आणि प्रत्यक्ष परीक्षा ही प्रक्रिया एकाच विद्याथ्र्याशी संबंधित असली तरी यात एमकेसीएल, भोपाळ बोर्ड, पुणो व मुंबई विद्यापीठ यांचे वेगवेगळे अधिकार क्षेत्र आहे. मात्र त्यांचे प्रवेश निश्चितीचे म्हणजे ‘अर्थ व्यवहार’ अधिकार संबंधित महाविद्यालयालाच आहेत. बाकीच्या संस्था फक्त एखाद्या तांत्रिक संस्थेप्रमाणो असल्याचे परीक्षा नियंत्रक भोंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
 
हतबलता..
च्हे प्रकरण आपल्यावर शेकणार हे कळल्यावर संस्थेचे अध्यक्ष रमेश मिश्र यांनी फोन बंद केला, तर सारवासारव करण्यासाठी पुढे आलेले सचिव थोरात सर यांनी विद्यापीठाने 4 डिसेंबर्पयत साधना महाविद्यालय सेंटर आहे म्हणून सांगितले व अचानक 6 डिसेंबरला फेरबदल केला, असा आरोप करून विद्यापीठालाच कटघ:यात उभे केले. 
च्विद्यापीठाच्या वतीने परीक्षा नियंत्रक भोंडे व उपकुलसचिव पराड यांनी विद्याथ्र्याची फसवणूक झाल्याचे मान्य केले, मात्र याबाबत फक्त कारवाईचे आश्वासन देऊन पीडित विद्याथ्र्याची बोळवण केली.