Join us  

वाय-फाय दुरुस्तीच्या नावाखाली घरात शिरला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:24 AM

८० वर्षीय आजीची चार तोळ्यांची सोन्याची चैन घेऊन पसार, भोईवाडा येथील घटना८० वर्षीय आजीची चार तोळ्यांची सोन्याची चैन ...

८० वर्षीय आजीची चार तोळ्यांची सोन्याची चैन घेऊन पसार, भोईवाडा येथील घटना

८० वर्षीय आजीची चार तोळ्यांची सोन्याची चैन घेऊन पसार, भोईवाडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाय-फाय दुरुस्तीच्या नावाखाली घरात चोर शिरल्याचा प्रकार भोईवाडा परिसरात समोर आला आहे. यात, ८० वर्षीय आजीला बोलण्यात गुंतवून तिची चार तोळ्यांची सोन्याची माळ घेऊन चोर पसार झाला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध नुकताच फसवणुकीचा गुन्हा नोंद करत, भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

करी रोड येथील महादेव पालव मार्गावर

८० वर्षीय आजी ४० वर्षीय मुलगी आणि १० वर्षांच्या नातवासोबत राहण्यास आहे. त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहे. त्यांची मुलगी कामावर गेल्यानंतर त्या नातवासोबत एकट्याच घरात असतात. याच दरम्यान ७ डिसेबर रोजी दुपारी चारच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती वाय-फाय दुरुस्तीसाठी आला. त्यांनीही विश्वास ठेवून त्याला घरात प्रवेश दिला. पुढे वाय-फाय राउटर पाहत असताना, एक वायरचा तुकडा द्या, येथे लावायचा आहे, असे आजींना सांगितले. त्यांनी वायरचा तुकडा नसल्याचे सांगताच, ठगाने गळ्यातील सोनसाखळी काढून देण्यात सांगितले. आईनेही विश्वास ठेवून गळ्यातील सोन्याची माळ काढून दिली. माळ तेथे लावण्याचा बहाणा केला. पुढे थुंकण्याचे नाटक करत तो बाहेर गेला, तो परतलाच नाही, तसेच तो पळून गेल्याचे समजताच त्यांनी संबंधित ठगाचा शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने त्यांना धक्का बसला.

साडेचारच्या सुमारास मुलगी घरी परतताच तिला घडलेला घटनाक्रम सांगताच त्यांनाही धक्का बसला. अन्य नातेवाइकाच्या मदतीने त्यांनी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

...

आरोपीचा शोध सुरू

अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस विनोद कांबळे यांनी सांगितले.