मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी केलेल्या मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा झाला असून महिला व बालकल्याण विभागाने बाजारभावापेक्षा अधिक दराने या मोबाईलची खरेदी केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केला. तर, हा आरोप अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात येत असून स्मार्ट फोनची किंमत ही विशेष सॉफ्टवेअर, डाटा कार्ड आदी साहित्यासह असल्याचा खुलासा मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील महिला व बाल कल्याण विभागाने केला आहे.राज्यातील एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविकांसाठी विभागाने स्मार्ट फोन खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी २८ फेब्रुवारीला शासन आदेश काढला गेला. त्यानुसार मे. सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या पुरवठा दाराकडून पॅनॉसानिक ईलुगा आय-सेव्हन या मोबाईल फोनची खरेदी करण्यात आली. बाजारात सहा हजाराला मिळणारा हा मोबाईल प्रत्यक्षात ८८७७ रूपयांना खरेदी करण्यात आला असून त्यामुळे १०६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला.महिला व बाल कल्याण विभागाने हा आरोप फेटाळून लावला आहे. निविदा प्रक्रियेत मान्य करण्यात आलेली किंमत ही फक्त मोबाईल फोनची नाही. फोनसोबतच मुलांची पोषणविषयक माहिती अपलोड करण्यासाठी मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, ३२ जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचाही त्यात समावेश आहे.>प्रक्रिया पारदर्शकचपारदर्शक पद्धतीने ही खरेदी प्रक्रीया पार पडल्याचे सांगतानाच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन अर्धवट माहिती प्रसारीत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण महिला व बाल कल्याण विभागाने दिले आहे.
मोबाइल खरेदीवरून मुंडे भावंडांत आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 4:57 AM