Join us

शाहरुख खानच्या या शाही 'मन्नत'चा असा आहे राजेशाही थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 7:13 PM

बॉलिवूडच्या या बादशहाचं घरही तसं शाही, राजेशाही आणि बादशाही आहे.

ठळक मुद्देमुंबईबाहेरुन येणं आणि स्वत:चं सगळं उभं करणं , ही एक यशाची व्याख्या असु शकते.शाहरुखनेही काहीच वर्षात स्वत:चं सगळं उभं केलं आहे. त्याला आता कशाचीही कमी नसेल.शाहरुख खाननेही मायानगरी मुंबईत आपला राजवाजासदृश महाल उभा केला आहे.

मुंबई : तुम्हाला कोणी तुमच्या ड्रीम हाऊसची संकल्पना विचारली तर तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी कोणता बंगला येईल? मन्नत? बरोबर? शाहरुख खानचा मन्नत बंगला सगळ्यांसाठीच ड्रीम हाऊस आहे. बॅण्ड स्टँड येथील शाहरुख खानचा भव्य बंगला पाहिला की प्रत्येकालाच वाटतं आपलाही असाच एखादा अलिशान बंगला असावा. पण मुंबईसारख्या ठिकाणी आता साधी खोली घ्यायची झाली तरी आपली जन्मभराची जमापूंजी कमी पडेल. पण दिल्लीतून येऊन, बॉलिवू़डमध्ये स्ट्रगल करून, नाव कमवून शाहरुख खानने मुंबईत आपलं बस्तान बांधलं, नव्हे तर साम्राज्य उभं केलं. त्याचं हेच 'बस्तान' बघायला लोक दूरवरुन येतात. त्याची एक झलक पाहण्यासाठी  त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी झालेली असते. पण त्याच्या या बंगल्याविषयी, बंगल्याच्या बांधकामाविषयी फार कमी लोकांना माहित आहे. 

बंगल्यासाठी मालकाकडे याचना

कदाचित तुम्हाला नवल वाटेल पण शाहरुख खानला एक मोठी प्रार्थना खोली त्याच्या बंगल्यामध्ये हवी होती. त्यामुळे साहजिकच तो एका मोठ्या जागेच्या शोधात होता. शाहरुख खान जिथे आज राहतोय ती जागा एका गुजराती माणसाची होती. हा गुजराती माणूस शाहरुख खानचा शेजारी होता. हा बंगला पाहिल्यावरच तो त्याला फार आवडला. त्यावेळेस या बंगल्याचं नाव होतं विल्ला विएन्ना. बंगला पाहताच क्षणी त्याच्या पसंतीस उतरल्याने या बंगल्याचा मालक नरिमन डबश यांच्याकडे त्याने बंगला विकण्याची विनंती केली. मात्र तो मालक काही तयार होईना. शेवटी फार याचना केल्यानंतरच मालक राजी झाला आणि शाहरुख खानने तो बंगला विकत घेतला. 2001 साली त्याने हा बंगला विकत घेताना त्याची किंमत जवळपास 13.32 कोटी एवढी होती. आता या बंगल्याची किंमत 200 कोटीच्या वर असल्याचं जाणकार सांगतात.

बंगल्याचा प्रशस्त विस्तार

या बंगल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ६ हजार स्क्वेअर फुट जागेवर हा बंगला पसरलेला आहे.  २२५ जण राहू शकतील एवढी जागा या बंगल्यात उपबल्ध आहे. ६ माळ्याच्या या बंगल्यात ५ प्रशस्त खोल्या आहेत. या खोल्यांच्या आकारांची कदाचित आपली घरं असतील. या प्रशस्त बंगल्याला अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांसोबतच इतर प्रसिद्ध व्यक्तींनीही या बंगल्याला भेटी दिल्या आहेत. 

मन्नतची सजावट

मन्नत व्हाईट मार्बलपासून बनवण्यात आलेला आहे. सहा माळ्यांचा हा बंगला असून बंगल्यात एलिव्हेटेड पायऱ्या आहेत. दोन खोल्या जोडण्यासाठी एलिव्हेटेडचा वापर करण्यात आलाय. त्याच्या घरातील इंटेरिअरचं संपूर्ण काम त्याची पत्नी गौरीने केलेलं आहे. गौरीला चार वर्षांपेक्षाही अधिक काळ या बंगल्याला सजवण्यात गेलाय असं काहीजण सांगतात. जीम, प्रार्थनेची खोली, वाचनाची खोली, बार,  मनोरंजनाची खोली आणि ५ रुम्स अशा वेगवेगळ्या पद्धतीने या बंगल्याची सजावट करण्यात आलीय.

जगातील टॉप १०पैकी एक बंगला

हा बंगला फक्त मुंबईकरांमध्येच प्रसिद्ध आहे असं नाही. पण जगभरातल्या मोठ्या घरांमध्ये शाहरुखचा मन्नत टॉप १० मध्ये मोडतो. यावरुनच आपण विचार करु शकतो की, बाहेरुन दिसणारा प्रशस्त बंगला आतून किती अलिशान आहे, म्हणूनच जगभरात या बंगल्याची चर्चा आहे. लोक ड्रीम हाऊसचा विचार करताना नेहमीच मन्नत बंगल्याचा विचार करतात. 

विल्ले विएन्ना टू जन्नत बिफोर मन्नत

या बंगल्याचं नाव पूर्वी विल्ले विएन्ना होतं. २००१ साली शाहरुख खानने हा बंगला खरेदी केल्यावर जन्नत असं नाव ठेवण्यात येणार होतं. या बंगल्यात आल्यावर शाहरुखच्या करिअरलाही चांगलंच वळण लागलं. त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले. त्यामुळे या बंगल्याला जन्नत नाव देण्यापेक्षा मन्नत हे नावच जास्त उचित आहे असं त्याला वाटलं. म्हणून त्याने विल्ले विएन्नाचे मन्नत हे नाव ठेवलं.

टॅग्स :शाहरुख खानमुंबईघर