Join us

‘कुलकर्णीवर बलात्काराच्या गुन्ह्याबाबत विचार करा’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 3:58 AM

शिफु सनकृतीचा प्रमुख सुनील कुलकर्णी याच्यावर दोन मुलींच्या पालकांनी बलात्काराचा आरोप केला आहे. हा आरोप आणि उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन कुलकर्णीवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला सोमवारी केली.

मुंबई : शिफु सनकृतीचा प्रमुख सुनील कुलकर्णी याच्यावर दोन मुलींच्या पालकांनी बलात्काराचा आरोप केला आहे. हा आरोप आणि उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन कुलकर्णीवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला सोमवारी केली.सोशल मीडियाद्वारे शिफु सनकृतीच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींच्या पालकांनी कुलकर्णीवर गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी कुलकर्णीला एप्रिलमध्ये अटक केली. त्याच्यावर फसवणूक, तस्करी, बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.सोमवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील संदेश पाटील यांनी गुन्हे अन्वेषण विभागाने केलेला तपास असमाधानकारक असल्याचे न्या. आर. एम. सावंत व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाला सांगितले.साक्षीदारांनी जबाब नोंदवूनही पोलिसांनी कुलकर्णीवर भारतीय दंडसंहिता ३७६ (बलात्कार ) अंतर्गत गुन्हा नोंदवला नाही, असे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे न्यायालयाला सांगितले.‘पुढील तपास सुरू असून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवायचा की नाही, याची माहिती देण्यासाठी एक दिवस द्या,’ अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली.

टॅग्स :मुंबई हायकोर्टबलात्कारगुन्हा