Join us

सुरक्षेसाठी ‘तिसरा डोळा’; मध्य रेल्वे मार्गावर आता ड्रोनची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:01 AM

मुंबई विभागातील सर्वच स्थानकांचे होणार सर्वेक्षण

- कुलदीप घायवट मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील सर्व म्हणजे ११५ स्थानकांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सीएसएमटी ते इगतपुरी, लोणावळा आणि रोह्यापर्यंत असलेल्या सर्व स्थानकांवरील आणि स्थानकांच्या परिसराचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाईल. अपघात, सुरक्षा, रेल्वे मार्गावरील मालमत्ता यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.सर्वेक्षणात सीएसएमटी ते इगतपुरी (१३७ किमी), लोणावळा (१२८ किमी), खोपोली (११५ किमी) आणि रोहा (१४४ किमी) या परिसराची आताची स्थिती कॅमेऱ्यातून कैद केली जाईल. मध्य रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघाताची नोंद, अपघाताचे कारण, अपघात होण्याआधीची आणि नंतरची स्थिती या सर्व माहितीचा दस्तावेज बनविण्यात येईल. ड्रोनच्या साहाय्याने चोरी, गुन्ह्यांचा उलगडा करणेही सोपे होईल. रेल्वेची मालमत्ता, अतिक्रमणाच्या घटना या सर्व बाबींवरही ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पावसाळ्यापूर्वी जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी एखाद्या कंपनीला नियुक्त करायचे की रेल्वे कर्मचाºयांना प्रशिक्षित करून सर्वेक्षण करायचे, याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे. ड्रोनचा वापर सुरक्षेसह इतर कामांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.२८ लाखांचा खर्च अपेक्षितड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी २८ लाख खर्च अपेक्षित आहे. ड्रोन उडविण्यासाठी लागणारी विविध विभागांची परवानगी घेण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीचे दस्तावेज पाहण्याचा अधिकार मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांना असेल.

टॅग्स :मध्य रेल्वे