तिसरी घटना! उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 09:51 PM2019-07-15T21:51:32+5:302019-07-15T21:52:32+5:30

अमित मुन्नालाल जैसवाल असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे.

The third incident! Death of one and a half year old falls into open gutters | तिसरी घटना! उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 

तिसरी घटना! उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देधारावीतील उघड्या  नाल्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.वरळीतील कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून आणखी एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

 

मुंबई - उघड्या गटारीत पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकला दिव्यांश बेपत्ता असताना धारावीतील उघड्या  नाल्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अमित मुन्नालाल जैसवाल असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे.

धारावीतील उद्यान क्रमांक 1 मधील राजीव गांधी कॉलनीजवळच्या पिवळा बंगला परिसरातील नाल्याजवळ ही घटना घडली. या नाल्यात दुपारी 3 च्या सुमारास अमित नाल्यात पडून बुडू लागला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला नाल्याबाहेर काढत सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.गेल्या बुधवारी (१० जुलै) मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकात अचानक खेळता खेळता तो उघड्या गटारीत पडला. या घटनेला पाच दिवस उलटूनही अद्याप तो सापडलेला नाही. यानंतर शनिवारी (१३ जुलै) वरळीतील कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून आणखी एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बबलू कुमार रामपुनिल पासवान असे या १२ वर्षीय मुलाचे नाव आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गटारीत, उघड्या नाल्यात, खड्ड्यात पडल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तसेच पालिकेला उशिरा जाग आल्याने त्यांनी ट्विटरद्वारे उघड्या गटाराबाबत माहिती देण्यासाठी एक संपर्क क्रमांक देखील जाहीर करण्यात आला. 

Web Title: The third incident! Death of one and a half year old falls into open gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.