नव्या आसनव्यवस्थेची तिसरी लोकल

By admin | Published: March 2, 2016 03:19 AM2016-03-02T03:19:40+5:302016-03-02T03:19:40+5:30

लोकलमधून पडून होणारे अपघात रोखतानाच गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी लोकल डब्यांतील आसनव्यवस्थेत बदल केले जात आहेत

Third locality of new Seismann system | नव्या आसनव्यवस्थेची तिसरी लोकल

नव्या आसनव्यवस्थेची तिसरी लोकल

Next

मुंबई : लोकलमधून पडून होणारे अपघात रोखतानाच गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी लोकल डब्यांतील आसनव्यवस्थेत बदल केले जात आहेत. मध्य रेल्वे मार्गावर अशा बदल केलेल्या दोन लोकल दाखल झालेल्या असतानाच आता आणखी एक लोकल उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात
आले. तिसऱ्या लोकलच्या तब्बल आठ डब्यांमधील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
यामुळे अतिरिक्त ८७२ प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचा रेल्वेतर्फे दावा करण्यात आला आहे. ही लोकल ३ मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा विचार केला जात आहे.
लोकल मार्गांवरील अपघातांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने डब्यातील आसन व्यवस्थेत बदल करण्याची सूचना केली. त्यानुसार आसन व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने प्रवासी क्षमता वाढतानाच गर्दीतला प्रवासही सुकर होत असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला. पहिल्या दोन लोकलनंतर आता आसनव्यवस्थेत बदल केलेली आणखी एक लोकल उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत आणली जात आहे. प्रवाशांच्या सेवेत येणाऱ्या या लोकलच्या तब्बल आठ डब्यांमधील आसनव्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे आसनव्यवस्थेत बदल करण्यात आलेल्या डब्यांमध्ये जादा हॅण्डलही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Third locality of new Seismann system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.