तृतीयपंथी समाजाने नशामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:06 AM2021-02-15T04:06:12+5:302021-02-15T04:06:12+5:30

मुंबई : स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतीयपंथी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले. ...

Third party society should take initiative for de-addiction | तृतीयपंथी समाजाने नशामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा

तृतीयपंथी समाजाने नशामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा

Next

मुंबई : स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतीयपंथी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले. नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान संपूर्ण भारतात व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात येत आहे. या अंतर्गत तृतीयपंथीयांनी स्वतः निर्व्यसनी राहून याबाबत समुपदेशन, उपचार, प्रचार करावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तृतीयपंथीयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन निवतकर यांनी केले.

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल मडामे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेसमवेत राहून आपल्या संपर्कात येणाऱ्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी आजीवन व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण केली, तर तृतीयपंथीयांची मुंबईतील लोकसंख्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोई, सुविधा यांची माहिती घेऊन नियोजन करण्यासाठी सर्व्हे फॉर्म भरून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले.

Web Title: Third party society should take initiative for de-addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.