तृतीयपंथी करणार मालमत्ता करवसुली

By Admin | Published: October 27, 2016 01:50 AM2016-10-27T01:50:41+5:302016-10-27T01:50:41+5:30

मालमत्ता थकबाकीची वसुली तृतीयपंथीयांकडून करण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घेतला आहे. थकबाकी ३६० कोटींवर

The third person will tax property tax | तृतीयपंथी करणार मालमत्ता करवसुली

तृतीयपंथी करणार मालमत्ता करवसुली

googlenewsNext

उल्हासनगर : मालमत्ता थकबाकीची वसुली तृतीयपंथीयांकडून करण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घेतला आहे. थकबाकी ३६० कोटींवर गेली असून दिवाळीनंतर बॅण्डबाजा पथकासोबत तृतीयपंथी पालिका कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी सहकार्य करणार आहेत.
आयुक्तांनी मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांच्याकडे वसुलीचे अधिकार दिले आहेत. त्यांनी थकबाकी असलेल्या मालमत्तेची यादी बनवली असून मोठ्या थकबाकीदारांकडून प्रथमच वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. न जुमानणाऱ्या थकबाकीदारांना नोटिसा पाठवून ८ दिवसांत थकबाकी भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर, मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी जप्त केलेल्या ३९ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. मालमत्ता थकबाकी वसुलीसाठी नगरसेविका रेखा ठाकूर यांनी आयक्तांशी भेट घेत तृतीयपंथीयांची वसुलीसाठी मदत घ्या, अशी संकल्पना मांडली. आयुक्तांनीही कल्पनेला होकार देत त्यांना मानधन देण्याची ग्वाही दिली.(प्रतिनिधी)

थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी विभागाने या पूर्वी पथनाट्य, बँडबाजा, महिला बचत गट यांची मदत घेतली.

Web Title: The third person will tax property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.