Join us

तिसऱ्या टप्प्याचे आकडे ४ दिवसांनी झाले अपडेट; चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 1:47 PM

मागील काही दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा शनिवारी शांत झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ व ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागांसह १० राज्यांतील ९६ मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान होणार आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा शनिवारी शांत झाल्या.

चौथ्या टप्प्यात राज्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी व बीड शिरूर या ११ मतदारसंघांत शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या.

तिसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी ७ मे रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केली. त्यानुसार देशभरात सरासरी ६५.६८%, तर राज्यात ६३.५५% मतदान झाले.

राज्य (जागा)  ११ मे रोजीचे अंतिम आकडे

आसाम (४)    ८५.४५    बिहार (५)    ५९.१५    छत्तीसगड (७)    ७१.९८    दा.न.हवेली व दीव(२)    ७१.३१कर्नाटक (१४)    ७१.८४गोवा (२)    ७६.०६गुजरात (२५)    ६०.१३मध्य प्रदेश (९)    ६६.७५महाराष्ट्र (११)    ६३.५५उत्तर प्रदेश (१०)    ५७.५५पश्चिम बंगाल (४)    ७७.५३एकूण (९३)    ६५.६८

मतदार संघ  ११ मे रोजीचे अंतिम आकडे

बारामती     ५९.५०हातकणंगले     ७१.११कोल्हापूर     ७१.५९लातूर    ६२.५९माढा     ६३.६५उस्मानाबाद    ६३.८८रायगड     ६०.५१रत्नागिरी-सिंधुदुर्ग     ६२.५२सांगली     ६२.२७सातारा     ६३.१६सोलापूर     ५९.१९एकूण (११)    ६३.५५ 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४