कोरोनाची तिसरी लाट येतेय? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:53 PM2021-08-31T12:53:28+5:302021-08-31T12:56:44+5:30

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना तिसरी लाट येतेय? याबद्दल राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, लाट यायला समुद्रय का, असा भन्नाट प्रतिप्रश्न राज यांनी केला. तसेच कुठं काही जाणवतंय का तुम्हाला.

The third wave of corona coming? Raj Thackeray's abandoned answer to the journalist's question | कोरोनाची तिसरी लाट येतेय? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं भन्नाट उत्तर

कोरोनाची तिसरी लाट येतेय? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं भन्नाट उत्तर

Next
ठळक मुद्देमी तर बाहेर पडतोच आहे, मी माझ्या लोकांनाही सांगितलंय. सरकारने लवकरच मंदिरे उघडी न केल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटानाद करू, असा इशाराही राज यांनी दिला आहे. 

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि नियमावली यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात आज दहीहंडी उत्सव साजरा होत नाही, त्यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झाली आहे. त्यामुळेच दुसरी लाट, तिसरी लाट आणि चौथी लाट अशी भीती घातली जातेय, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. पत्रकाराने तिसऱ्या लाटेसंदर्भात दिलेल्या प्रश्नावरही राज यांनी भन्नाट उत्तर दिलं. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना तिसरी लाट येतेय? याबद्दल राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, लाट यायला समुद्रय का, असा भन्नाट प्रतिप्रश्न राज यांनी केला. तसेच कुठं काही जाणवतंय का तुम्हाला. उगीच इमारती सील करायच्या, यापूर्वी या देशात कधी रोगराई आलीच नव्हती, असे म्हणत राज यांनी संताप व्यक्त केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू आहे. मी तर बाहेर पडतोच आहे, मी माझ्या लोकांनाही सांगितलंय. सरकारने लवकरच मंदिरे उघडी न केल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटानाद करू, असा इशाराही राज यांनी दिला आहे.

मुंबईत 'कृष्णकुंज'वर पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधाला न जुमानता आज ठिकठिकाणी मनसैनिकांनी दहीहंडी साजरी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. "जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरं करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? तिथं भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात प्रवेश करुन अभिषेक केला. केली मग सत्ताधाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का?", असे सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. 

मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा

राज्यात सर्व कामं व्यवस्थित सुरू आहेत. महापौर बंगल्यावर रोज बिल्डरांची वाहनं येताना दिसतात. लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरे करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. फक्त 'ते' घराबाहेर पडत नाहीत त्याला आम्ही काय करणार?, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

Web Title: The third wave of corona coming? Raj Thackeray's abandoned answer to the journalist's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.