कोरोनाची तिसरी लाट निश्चित थोपविणारच - डॉ. तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:31+5:302021-05-24T04:06:31+5:30

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळवले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच ...

The third wave of corona will definitely stop - Dr. Tatyarao Lahane | कोरोनाची तिसरी लाट निश्चित थोपविणारच - डॉ. तात्याराव लहाने

कोरोनाची तिसरी लाट निश्चित थोपविणारच - डॉ. तात्याराव लहाने

Next

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळवले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच विजय मिळवू, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी बोरिवलीत व्यक्त केला.

बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात वसंत व्याख्यानमालेचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून दुसरे पुष्प गुंफताना मास्क हा आपल्या कपड्यांबरोबरचा एक अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

वसंत व्याख्यानमालेचे ‘कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र शासनाने कोरोनाविरोधातील युद्ध लढताना काय काय उपाययोजना केल्या, त्याची सविस्तर माहिती दिली. कोरोना विषाणू जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला, तेव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या आणि मग त्या कशा वाढत गेल्या, त्याची माहिती देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहृदयी नेतृत्वाची आणि त्यांची कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धत याचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाला, वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले तर डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी घेतली.

‘अजूनही ५० टक्के लोक मास्क वापरत नाहीत‌’

मास्क, सॅनिटायझर आणि सतत हात धुणे या गोष्टी अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगताना डॉ. तात्याराव लहाने यांनी आजही पन्नास टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे सांगून यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार बंद व्हायला हवेत, अशा प्रकारांमुळे वैद्यकीय यंत्रणेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असेही नाराजी व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The third wave of corona will definitely stop - Dr. Tatyarao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.