मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या विज्ञानशाखेच्या तिसऱ्या वर्षाचा (बी.एस्सी)निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या मध्ये बीएस्सी ७५: २५ पॅटर्नचा निकाल अवघा ५०.८३ टक्के इतका लागला आहे, तर ६०: ४० पॅटर्नचा निकाल ९.१५ टक्के इतका घसरला आहे. बी.एस्सीच्या या दोन्ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेच्या ७५:२५ पॅटर्नसाठी १७ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी १७ हजार २१० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील ८ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ६०:४० पॅटर्नसाठी ७७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यातील ६५९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)
‘बी.एस्सी’च्या तृतीय वर्षाचा निकाल जाहीर
By admin | Published: June 12, 2016 4:39 AM