करोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, ठाणे पालिकेचे आरोग्य केंद्रे सुविधा व कर्मचारी अभावी व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:27 PM2020-07-03T14:27:08+5:302020-07-03T14:31:26+5:30

ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचा सामना करत असताना आरोग्य विभागातील पदांच्या गळतीचा फटका मात्र सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. ...

Thirteen of the health system in Corona, Thane Municipal Health Centers on ventilators due to lack of facilities and staff. | करोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, ठाणे पालिकेचे आरोग्य केंद्रे सुविधा व कर्मचारी अभावी व्हेंटिलेटरवर

करोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, ठाणे पालिकेचे आरोग्य केंद्रे सुविधा व कर्मचारी अभावी व्हेंटिलेटरवर

googlenewsNext

ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचा सामना करत असताना आरोग्य विभागातील पदांच्या गळतीचा फटका मात्र सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. शिवाय कमी मनुष्यबळामुळे सद्यस्थित असलेल्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडत असल्याचे पुढे आले आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीचा फटका मात्र ठाण्यातील करोना रूग्णांना बसत आहे. करोना रूग्णांना उपचारसाठी वेळेत बेड न मिळणे, अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध न होणे यामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्यामुळे ठाणे शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे. ठाणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाणे शहरात करोना रूग्णांची संख्या 9 हजारांवर टेकली आहे. तर 340 जणांचा या करोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील अनेकांना वेळेत उपचार आणि आरोग्याच्या सूविधा न मिळल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. पालिकाने प्रभागसमितीनिहाय टीम नेमली आहे, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. ही टीमही काहीच काम करत नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात ३० आरोग्य केंद्र आहेत यामध्ये ३० हून अधिक वैद्यकीय अधिकारी आहे. पण या अधिकाऱ्यांवर सर्व जबाबदारी सोपविल्यामुळे काम करणे कठीण जात आहे. कर्मचारी वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे एका वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
ठाण्यातील एकूण लोकसंख्या २६ लाखांच्या घरात आहे. तर या २६ लाखाहून अधिक असलेल्या लोकसंख्येसाठी पालिकेचे केवळ ३० आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या अस्तित्वात असलेल्या ३० आरोग्य केंद्राची स्वत:ची अ‍ॅम्ब्युलन्ससेवा नाही. तर सध्याचे ३० आरोग्य केंद्र हे जवळ जवळ सव्वा लाख नागरिकांचे आरोग्य सांभाळत आहे. या केंद्रातील अधिकाऱ्याला रूग्ण तपासणी पासून करोना रूग्णाला रूग्णालय मिळवून देण्यापर्यंतची सर्वच कामे करावी लागत आहेत. रूग्णांना रूग्णालय उपलब्ध करून देण्यातच वैद्यकी अधिकाऱ्यांची दररोज पाच झ्रसहा तास जात अल्यामुळे उपचाराच्या सुविधा देण्यात कमी पडत आहे. त्यामुळे महापालिकेने कर्माऱ्यांची संख्या वाढवून रूग्णांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी मनसेच्या स्वप्निल महिंद्रकर यांनी केली.


आपला दवाखाना कागदावरच

आपला दवाखा सुरू करण्याबाबत दोन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत प्रायोगिक तत्वावर योजना राबविली. पण अवघ्या सहा महिन्यात ती अपयशी ठरूनही आणखी ५० दवाखाने उभारण्याची घोषणा केली. ५० दवाखाने यापूर्वीच योग्य उपाय-योजनासह राबविले असते तर आज करोनाच्या लढ्यात हे खूप उपयुक्त ठरले असते. त्यामुळे महापालिकेने याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मनसेच्या स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले.

Web Title: Thirteen of the health system in Corona, Thane Municipal Health Centers on ventilators due to lack of facilities and staff.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.