Join us

थर्टीफर्स्टला गजबजाट नव्हे, शुकशुकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:31 AM

दररोज थर्टीफर्स्टसारखा गजबजाट असलेल्या कमला मिल कंपाउंडमध्ये यंदा रविवारी आलेल्या थर्टीफर्स्टच्या दिवशीही शुकशुकाटाचे वातावरण होते. मोजोस बिस्ट्रो व वन अबव्ह या दोन पब व रेस्टॉरंटमधील दुर्घटनेनंतर पालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे येथे डीजेऐवजी पालिकेच्या हातोड्याचा आवाज घुमत होता.

- कुलदीप घायवटमुंबई : दररोज थर्टीफर्स्टसारखा गजबजाट असलेल्या कमला मिल कंपाउंडमध्ये यंदा रविवारी आलेल्या थर्टीफर्स्टच्या दिवशीही शुकशुकाटाचे वातावरण होते. मोजोस बिस्ट्रो व वन अबव्ह या दोन पब व रेस्टॉरंटमधील दुर्घटनेनंतर पालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे येथे डीजेऐवजी पालिकेच्या हातोड्याचा आवाज घुमत होता. तर जवळपास सर्वच पब व रेस्टॉ-बार रविवारी बंद असल्याने थर्टीफर्स्ट सेलीब्रेशनसाठी येथे पार्टीसाठी आलेल्या उच्चभ्रूंची हॉटेल व पब शोधण्यासाठी वणवण होताना दिसली.डिस्को थेक व पबचे केंद्रबिंदू असलेल्या कमला मिल कंपाउंडमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीने संपूर्ण चित्रच पालटले. रोजच रात्री येथे वाजणाºया डीजेची जागा रविवारी भकास वातावरणाने घेतली होती. पालिकेच्या कारवाईमुळे महिनाभरआधी पब आणि रेस्टॉमध्ये झालेली बुकिंग रविवारी रद्द करण्यात आली होती. बहुतेक हॉटेल्सवर पालिकेने हातोडा चालवत जमीनदोस्त केले होते. तर उरलेसुरलेले रेस्टॉ-बार आतून सुरू असतानाही बाहेरमात्र ‘क्लोज’चे बोर्ड लावण्यात आले होते.दरम्यान, दुर्घटनेच्या दोनच दिवसांनंतर सर्व काही आलबेल असेल, या इराद्याने कमला मिल कंपाउंडमध्ये येणाºया उच्चभ्रू युवकांचा पुरता हिरमोड होत होता. सुरक्षेच्या कारणास्तव गाड्या बाहेरच पार्क करून तरुणाई आतमध्ये पब व डिस्को थेकचा शोध घेत होती. आधीची बुकिंग ऐनवेळेला रद्द झाल्याने तरुणाईची नवे पार्टी लोकेशन शोधण्यासाठी पायपीट सुरू होती. पालिकेच्या कारवाईमुळे येथील ट्रेड हाऊस, स्मॅश, दी बॉम्बे कँटीन, फर्जी कॅफे तसेच इतर पब आणि हॉटेल्स आज पूर्णपणे बंद दिसले.पर्यटकांच्या जागीमनपा कर्मचारी!दरवर्षी कमला मिलमधील हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटमध्ये ख्रिसमसपासून ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. मात्र यंदा पर्यटकांची जागा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि मनपा कर्मचाºयांनी घेतली होती.पबच्या शोधात येणाºया पर्यटकांना येथील सुरक्षारक्षक हॉटेल्स बंद असल्याचे सांगत होते. त्यामुळे त्यांना गेटवरूनच परतावे लागले. याउलट गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तोडक कारवाईमुळे या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षेसाठी दोन अग्निशामक गाड्या व पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.कोट्यवधींची उलाढालही ठप्पयेथील पब व रेस्टॉमध्ये संपूर्ण वर्षभराचा नफा थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षातच्या सुरुवातीला होत असतो. विशेष थर्टीफर्स्टसाठी येथील हॉटेल्स व पबमध्ये आधीेच बुकिंग केली जाते. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या अग्नितांडवामुळे सर्वच हॉटेल्स मालकांनी आधीचे बुकिंग रद्द केले. परिणामी, हॉटेल मालकांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :हॉटेलकमला मिल अग्नितांडव