Join us

थर्टी फर्स्टला समुद्रकिनारी शुकशुकाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:06 AM

कुठे नाकाबंदी तर कुठे सेगवेवरून गस्तथर्टी फर्स्टला समुद्रकिनारी शुकशुकाट...कुठे नाकाबंदी तर कुठे सेगवेवरून गस्तलोकमत न्यूज नेटवर्क...

कुठे नाकाबंदी तर कुठे सेगवेवरून गस्त

थर्टी फर्स्टला समुद्रकिनारी शुकशुकाट...

कुठे नाकाबंदी तर कुठे सेगवेवरून गस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दरवर्षी थर्टी फर्स्टनिमित्ताने फटाक्यांच्या आतषबाजीत गजबजणाऱ्या समुद्रकिनारी, कोरोनामुळे लागू केलेल्या नाइट कर्फ्यूमुळे शुकशुकाट पाहावयास मिळाला. नाकाबंदी, गस्त तसेच ड्रोनद्वारे मुंबई पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते.

मुंबईत थर्टी फर्स्टनिमित्ताने पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीस प्रत्येक घडामोडीवर मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून होते. त्यात मुंबईत नाइट कर्फ्यू असल्याने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, नाकाबंदी करण्यात आली आहे. या वर्षी कुठल्याच पार्टीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पश्चिम उपनगरात पोलिसांचे विशेष लक्ष होते.

रात्री ११ नंतर रेस्टॉरंट, पब, हुक्का पार्लरही पोलिसांच्या गस्तीमुळे लॉक झालेले पाहावयास मिळाले. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करून वाहने आणि व्यक्तींची तपासणी केली.

सोबतच वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग’ अशा मोहिमा राबविण्यात आल्या. यात, जवळपास ३ हजार वाहतूक पोलीस ९४ टीममध्ये कार्यरत होते.

पोलीस ड्रोनद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. यात समुद्रकिनारी शुकशुकाट पाहावयास मिळाला. रात्री ११ नंतर जुहू, वांद्रे, वरळी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट परिसरात नागरिकांना रात्री ११ पूर्वीच घरी धाडण्यात आले. त्यामुळे या परिसरात शांतता पाहावयास मिळाली.

चौकट

1. गिरगाव : गिरगाव परिसरातही पोलिसांच्या गस्तीमुळे रात्री ११ नंतर नागरिक घराबाहेर निघाले नाहीत. छोट्या वाडीतही हीच परिस्थिती होती. नागरिकांनी स्वतःच घराबाहेर पडणे टाळलेले दिसून आले.

2. माझगाव : माझगाव कोर्ट परिसरातही शांतता होती. महिला पथकही माझगाव, भायखळा, नागपाडा परिसरात फिरताना दिसून आले.

3. कुलाबा : कुलाबा परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. या भागातील पब, रेस्टॉरंटबाहेर पोलिसांची गस्त सतत सुरू होती.

4. आनंद नगर टोल नाका : मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर टोल नाका परिसरात पोलीस नाकाबंदी करून मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना दिसून आले. त्यात म्हाडा कॉलनी, संभाजी मैदान परिसरातही नागरिकांची गर्दी दिसून आली नाही.

.....

फोटो

1. मरिन ड्राइव्ह : मरिन ड्राइव्ह परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करताना दिसले. मात्र रात्री ११ अंतर पोलिसांनी त्यांना नियमांची आठवण करून देत घरी धाडले. या वेळी सेगवेवरूनही पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या परिसरात रात्री ११नंतर शांतता होती.

2. गेट वे ऑफ इंडिया : गेट वे ऑफ इंडिया परिसरातही पोलिसांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करून घरी पाठवले. त्यामुळे या परिसरातही रात्री ११नंतर शुकशुकाट पाहावयास मिळाला.

3. मेट्रो सिनेमा : थर्टी फर्स्टनिमित्ताने पोलिसांनी या ठिकाणी नाकाबंदी करीत, वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती.

.....

वरळी सी फेस

वरळी सी फेस परिसरात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

....

रात्रीची नाकाबंदी...

१. मुंबईत नाइट कर्फ्यू असल्याने पोलिसांकडून महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावलेली पाहावयास मिळाली.

२. थर्टी फर्स्टनिमित्ताने ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांचीही पोलिसांकडून तपासणी सुरू होती.

3. वरळी, मरिन ड्राइव्ह परिसरात सेगवेवरून गस्त सुरू होती. काही नागरिक मास्क लावून दिसले. मात्र गर्दी दिसून आली नाही.

४. टवाळखोरांवर पोलीस लक्ष ठेवून होते. संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची गस्त सुरू होती.