‘थर्टी-फर्स्ट’ला चोरट्यांची चांदी

By admin | Published: January 2, 2015 12:44 AM2015-01-02T00:44:05+5:302015-01-02T00:44:05+5:30

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. ३१ डिसेंबरला शहरात सहा ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या

'Thirty-First' thieves silver | ‘थर्टी-फर्स्ट’ला चोरट्यांची चांदी

‘थर्टी-फर्स्ट’ला चोरट्यांची चांदी

Next

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. ३१ डिसेंबरला शहरात सहा ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये जवळपास साडेपाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे.
कोपरखैरणे सेक्टर ७मध्ये राहणाऱ्या ललिता येवले यांच्या घरामध्ये बुधवारी चोरी झाली. चोरट्यांनी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमधील ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
तर सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान कोपरखैरणे रेल्वे स्टेशनबाहेर
उभी केलेली रिक्षा एमएच ४३ अ‍ेसी ६२६ चोरीला गेली आहे.
वाशी सेक्टर ३मधील एमजीएम रुग्णालयाजवळ एमएच ०२ सीएच ५१४८ ही कार उभी केली होती. चोरट्यांनी कारची काच तोडून आतमधील ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.
महापे एमआयडीसीमध्ये अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंटतर्फे काम सुरू आहे. या कंपनीमधील अडीच
लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रीक मोटार चोरण्याचा प्रयत्न तीन जणांनी केला. इमरान खान, मोहमद शेख
उर्फ नसीम भंगारवाला व पप्पू झा अशी तिघांची नावे असून, त्यांच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
तर खांदा कॉलनीमध्ये राहणाऱ्या गणेश गवळी यांच्या घरामध्येही बुधवारी साडेअकरा ते १२ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आतमधील दागिने, मोबाइल व रोख रक्कम असा १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. तळोजामधील सुपर पॉलिमर या बंद कंपनीच्या भिंतीवरून आतमध्ये जाऊन चोरट्यांनी आतमधील ४ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले.
नववर्षाच्या अखेरच्या दिवशीही चोरट्यांनी सहा ठिकाणी हात साफ केला असून, यामुळे नवीन वर्षात गुन्हेगारांना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Thirty-First' thieves silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.