Join us

काय सांगता? २८३ वाहन चालकांना थर्टी फर्स्टची पार्टी पडली लाखात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 9:49 AM

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २८३ जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा दंड वसूल केला.

मुंबई : नववर्षाचे स्वागत केल्यानंतर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २८३ जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा दंड वसूल केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणे,  रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली.  यातील मद्यपान करणाऱ्या चालकांवर कारवाई केली.

३१ डिसेंबर, २०२३ रोजी रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर आपापल्या वाहनासह समुद्रकिनारी, पर्यटन ठिकाणे, उद्याने, शॉपिंग मॉल, उपाहारगृहे व आस्थापना तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र जमा झाले होते. त्याचप्रमाणे अनेक जण  धार्मिक स्थळी देवदर्शनाकरिता  गेले होते. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ :

नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह प्रकरणात वाढ झाली. मागील वर्षी जवळपास १५६ जणांवर कारवाई करण्यात आली होती.

असे केले वाहतूक नियमन :

वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून मुंबईतील वाहतूक गतिमान, व शिस्तबद्ध पद्धतीने करण्याकरिता मुंबई वाहतूक विभागामार्फत जवळपास १५० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस अंमलदार यांनी नियमन केले आहे. 

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस