मुंबईच्या समुद्रकिनारी सव्वातीनशे टन कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:41 AM2018-07-15T06:41:32+5:302018-07-15T06:41:42+5:30
समुद्राला शुक्रवार, शनिवार दोन दिवस मोठी भरती होती. या काळात समुद्रकिनारी उसळलेल्या लाटांमुळे मुंबईकरांनी समुद्रात फेकलेला कचरा लाटांद्वारे पुन्हा किनारी फेकला गेला.
मुंबई : समुद्राला शुक्रवार, शनिवार दोन दिवस मोठी भरती होती. या काळात समुद्रकिनारी उसळलेल्या लाटांमुळे मुंबईकरांनी समुद्रात फेकलेला कचरा लाटांद्वारे पुन्हा किनारी फेकला गेला. शनिवार सायंकाळपर्यंत यातील जवळपास सव्वातीनशे टन कचरा उचलला गेला असून अजूनही सफाईचे काम सुरू आहे. रविवारी पुन्हा मोठी भरती असल्याने या कचऱ्यात वाढ होणार आहे.
मुंबईत रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. या काळात मुंबईच्या समुद्रकिनारी साडेचार मीटर उंचीहून अधिक उंचीच्या लाटा उसळतील.शनिवारी मरिन ड्राइव्हवर लाटांद्वारे किनारी फेकला गेलेला १२ टन कचरा ५५ कामगारांच्या मदतीने पालिकेने उचलला. तर जुहू चौपाटीवर शुक्रवारी १२० टन आणि शनिवारी ६० टन कचरा गोळा झाला होता. वर्सोवा चौपाटीवर शुक्रवारी २४ टन आणि शनिवारी २२ टन कचरा गोळा झाला. दादर-माहीम किनाºयावर दोन दिवसांत ७९ टन कचरा उचलला गेला. हे कचरा हटविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
रविवारची सुट्टी असल्याने बहुतांशी पर्यटकांचा ओढा समुद्रकिनारी फिरण्याकडे असतो. गेट वे आॅफ इंडिया आणि मरिन ड्राइव्हसह जुहू व वर्सोवा चौपाटीवर पर्यटकांची गर्दी असते.
रविवारचा अतिवृष्टीचा इशारा आणि समुद्राची मोठी भरती; या दोन्हीचा विचार करता येथे येणाºया पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबईत आज अतिवृष्टी!
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत पावसाने शनिवारी विश्रांती घेतली असली, तरी उद्या, रविवारी मुंबई शहरासह उपनगरांत अतिवृृष्टी होईल, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. - वृत्त/३