तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण
By admin | Published: November 19, 2014 12:34 AM2014-11-19T00:34:23+5:302014-11-19T00:34:23+5:30
शहरातील लालचक्की परिसरातील १३ वर्षांची प्रांजली कापसे शिकवणीवरून वेळेत घरी न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली.
उल्हासनगर : शहरातील लालचक्की परिसरातील १३ वर्षांची प्रांजली कापसे शिकवणीवरून वेळेत घरी न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. कुठेच ठावठिकाणा न लागल्याने अखेर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
कॅम्प क्र.-४, लालचक्की, किसननगरात संतोश व्यंकटराव कापसे कुटुंबासह राहतात. त्यांची १३ वर्षांची मुलगी प्रांजली स्टेशन रोडवरील जेकब क्लासला जाते. मात्र, सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतरही ती घरी न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली.
क्लासमधून ती वेळेत घरी न गेल्याचे समजल्यावर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडेही चौकशी सुरू केली़ तिचा कुठेच ठावठिकाणा न लागल्याने अखेर वडील संतोष कापसे यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. (प्रतिनिधी)