हा निर्णय फेसबुकवरही सांगता आला असता; सोशल मीडियात मनसे कमेंट
By स्नेहा मोरे | Published: April 11, 2024 09:04 AM2024-04-11T09:04:25+5:302024-04-11T09:04:49+5:30
‘ते’ व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर
स्नेहा मोरे
मुंबई : राज ठाकरे यांनी महायुतीबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे नेटिझन्समध्ये प्रतिक्रियांचा पाऊस आहे. सोशल मीडियावर राज ठाकरे यांचे जुने व्हिडीओ पुराव्याप्रमाणे व्हायरल करत त्या भाषणांमधील मते आणि मंगळवारी जाहीर सभेत मांडलेले विचार यांतील भेद दाखवला जात आहे. ठाकरेंच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या मनसैनिकांची खदखदही पोस्ट्स, व्हिडीओंतून बाहेर येत आहे. राज यांच्या भूमिकेनंतर मिम्स करण्याला वेग आला.
‘ते’ व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर
बदलत्या भूमिकांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना मनसैनिकांकडून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या विचारांचे व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर केले जात आहे.
अशा संदेशांचा सोशल मीडियावर पाऊस
वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला.
अशी भूमिका घ्या की आपल्यासह समोरचे कार्यकर्तेही संभ्रमात पडतील.
या निर्णयासाठी सभेची गरज का होती?
महागाई, बेरोजगारी, मणिपूर, शेतकरी आंदोलन या मुद्द्यांना बाजूला सारत फक्त पाठिंबा एके पाठिंबा.
या पाठिंब्यामुळे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेला ‘राम राम’ ठोकणार.
मनसेला गेल्या १७ वर्षांत मुंबईत लोकसभेसाठी उमेदवार तयार करता आला नाही, हे पक्षाचे अपयश आहे.
महायुतीसाठी मनसेचा पाठिंबा हा ‘टीम बी’सारखा आहे.
राजसाहेब तुम्हीतरी ‘अंधभक्त’ होऊ नका, मनसेचीही शिंदेसेना करा.