काही दिवसांचा खेळ, हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:15 PM2023-05-01T19:15:23+5:302023-05-01T19:16:48+5:30

हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार झालं आहे, आदित्य ठाकरेंचा टीकेचा बाण.

this government will collapse shiv sena uddhav thackeray group Aditya Thackeray said bitterly in the Vajramooth rally mumbai | काही दिवसांचा खेळ, हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

काही दिवसांचा खेळ, हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

googlenewsNext

“गेल्या अडीच वर्षांमध्ये महराष्ट्रात आपण एक मजबूत टीम म्हणून काम करत होतो. त्या अडीच वर्षांमध्ये कोविडच्या काळात महाराष्ट्राला सांभाळलं. जेव्हा अर्थचक्र बंद पडलं तेव्हा जून २०२० ते जून २०२२ पर्यंत साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली ही महाविकास आघाडीची ताकद होती. त्या अडीच वर्षांत दंगली झाल्या नाही, कोणासोबत भेदभावही धाला नाही. प्रत्येक जण सर्वांची काळजी घेऊन काम करत होता,” असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं. मुंबईत आयोजित वज्रमुठ सभेत त्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला. 

“आज महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलंय. तुम्हाला लिहून देतोय, थोड्या दिवसांचा खेळ आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच,” असं आदित्य  ठाकरे म्हणाले. या सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकही महिला दिसल्यात का? मुंबईचा माणूस अस्सल मराठी माणूस दिसलेत का? स्क्वेअरफूट विकणारे असतील पण इंच इंच जाणणारे कोणी नाही. ना मुंबई, पुण्याचा, ना जिल्ह्याचा ना शेतकऱ्यांचा आवाज आहे. हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार झालं आहे, असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.

“गेल्या नऊ दहा महिन्यांमध्ये पाहात आहात. अवकाळी पाऊस झाला आहे. हे अवकाळी सरकारच बसलाय. शेतकऱ्याचं ऐकणारं सरकारमध्ये कोणी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत. महिलांवरील अत्याचार वाढतायत. सुप्रिया सुळेंना शिव्या देणारे गद्दार मंत्री त्यांची हकालपट्टी झाली नाही. सुषमा अंधारेंना बोलणाऱ्यांवर कारवाई नाही. तर इतरांनी काय अपेक्षा कराव्या. अनेक प्रकल्प राज्यातून निघून गेले आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

गुजरातकडे दोन मुख्यमंत्री
आज घडनाबाह्य सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वाटतायत का? आजच्या दिवशी गुजरातकडे दोन मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय, एक तिकडचे खरे आणि दुसरे आपल्याकडे बसलेले. पण आपल्याकडे मुख्यमंत्री नसल्यासारखा कारभार सुरू आहे. या अंधारातून आपल्याला बाहेर पडायचंय. ही वज्रमूठ एकत्र करून आपल्याला बाहेर पडायचं असल्याचंही ते म्हणाले.

Web Title: this government will collapse shiv sena uddhav thackeray group Aditya Thackeray said bitterly in the Vajramooth rally mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.