मुंबई : मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामांची कॅग चौकशी केली तर एवढे सगळे निघाले. हा तर फक्त ट्रेलर आहे; असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या सत्ताकाळातील आणखी प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.
फडणवीस यांनी कॅगचा अहवाल सभागृहात मांडला तेव्हा विरोधी पक्षांचे सदस्य सभात्याग करून बाहेर पडले होते. मात्र भाजपच्या सदस्यांनी या कॅगने समोर आणलेल्या अनियमिततांची एसीबी चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी स्पष्ट केले की, विधिमंडळाच्या लोकलेखा समितीकडे कॅगचा अहवाल चौकशीसाठी पाठविला जाईल.
या अहवालात महापालिकेचा अपारदर्शक आणि भ्रष्ट कारभार समोर आणला आहे. त्यातील जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे त्याची चौकशी ही एखाद्या तपास संस्थेमार्फत करण्याचा नक्की विचार करू आणि अगदी उघड ज्या बाबी अहवालात समोर आल्या आहेत त्यावरही कारवाई करू असे, ते म्हणाले.