"कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे ...", सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:46 IST2025-03-21T16:32:29+5:302025-03-21T16:46:40+5:30

Sushama Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

this woman was earlier approaching Uddhav Thackeray to join the party Sushma Andhare criticized Chitra Wagh | "कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे ...", सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचले

"कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे ...", सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचले

Sushama Andhare ( Marathi News ) : काल विधान परिषदेत भाजपाच्या आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. काल दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या पुन्हा चौकशीच्या मागणीवर सभागृहात आरोप-प्रत्यारोप झाले. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपा आमदार चित्रा वाघ यांनीही ठाकरेंना लक्ष केले. दरम्यान, आता शिवसेनेतील उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार वाघ यांना डिवचले आहे. 

CM फडणवीसांची दिशा सालियन प्रकरणात पहिली प्रतिक्रिया; सरकारची भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

"कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, अशी टीका सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसत आहे. त्यांनी आकडा कमी सांगितला. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे,राज्याच्या सभागृहाची परंपरा मोठी आहे. कालचा थयथयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. 

'नागपूर दंगलीतील आरोपी भाजपा संबंधित'

यावेळी सुषमा अंधारे यांनी नागपूर दंगलीवरुन भाजपावर टीका केली. अंधारे म्हणाल्या, नागपूर दंगलीतील आरोपी भाजपा संबंधित आहे. त्याबाबत आपण पुरावे लवकर दाखवणार आहे. नागपूर दंगल अंगाशी आली म्हणून भाजपाने दिशा सालियान प्रकरण काढले आहे, एखाद्याच्या दु:खाच राजकारण करण्याच काम भाजपा करत आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. 

"सभागृहात आणखी एक बाई होत्या, त्यांना आम्हीच सदस्यत्व दिले. पण, जिकडे खावा तिकडे थवा असं काम आहे. या बायकांच्या आडून भाजपा तिर मारत आहे. म्हणून मी इथे उत्तर देत आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. 

Web Title: this woman was earlier approaching Uddhav Thackeray to join the party Sushma Andhare criticized Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.