शिवडीच्या क्षय रुग्णालयात थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया, ३0 टक्के रुग्णांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:46 AM2017-08-20T03:46:20+5:302017-08-20T03:46:39+5:30

शिवडी क्षय रुग्णालयात क्षयरोगावरील उपचारासाठी थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यास आरंभ झाला आहे. नुकतीच एका रुग्णावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली.

 Thoracoscopic surgery at Sewri Cancer Hospital, 30% of patients will benefit | शिवडीच्या क्षय रुग्णालयात थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया, ३0 टक्के रुग्णांना होणार फायदा

शिवडीच्या क्षय रुग्णालयात थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया, ३0 टक्के रुग्णांना होणार फायदा

googlenewsNext

मुंबई : शिवडी क्षय रुग्णालयात क्षयरोगावरील उपचारासाठी थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यास आरंभ झाला आहे. नुकतीच एका रुग्णावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. जर औषधे घेऊन क्षयरोग बरा होत नसेल, तर त्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच या रुग्णालयात ८० वर्षांच्या इतिहासात क्षयरोगासाठीची ‘व्हिडीओ असिस्टेड थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया’ करण्यात आली होती.
उत्तर प्रदेश येथील रहिवासी असणारा २२ वर्षीय तरुण क्षयरोगाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, त्या मुलाला फक्त तीन दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि आता त्याच्या प्रकृतीत बºयाच सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवडी रुग्णालयाच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या चमूचे कौतुक आहे. किमान २0-३0 टक्के क्षयरोग रुग्णांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. ललितकुमार आनंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अशा शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ सर्जन आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असणे गरजेचे असते. खासगी रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून क्षयरोगावर थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, पण त्याचा खर्च जवळपास १ ते ५ लाखांपर्यंत जातो, पण पालिकेच्या क्षय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया जवळपास मोफत केली जात आहे. क्षयरोग उपचारांसाठी शस्त्रक्रियेचा वापर होऊ शकतो, याबद्दल रुग्ण आणि डॉक्टरांमध्येही जागरूकता होणे गरजेचे आहे. फुप्फुसाच्या टीबीबाबत शस्त्रक्रियेचा किती मोठा वाटा आहे, याबद्दल डॉक्टरांमध्येही जागृती नाही. ही शस्त्रक्रिया जर योग्य वेळी केली, तर रुग्ण पूर्णपणे टीबीमुक्त होऊ शकतो, असे रुग्णालयाचे आॅननरी थोरॅसिक सर्जन डॉ. अमोल भानुशाली यांनी सांगितले.

व्हिडीओ असिस्टेड थोरॅकोस्कॉपिक सर्जरी
छातीत १ ते दीड सेंटीमीटर लांबीची ३ छिद्रे पाडली जातात. एकातून दुर्बीण आणि दुसºया दोन छिद्रांतून साधने टाकली जातात. त्यानंतर, मॉनिटरवर बघून ही शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे ही शस्त्रक्रिया रुग्णासाठी कमी त्रासदायक ठरते. लंग कॅन्सरसाठी प्राधान्याने ही शस्त्रक्रिया केली जाते, पण फुप्फुसाच्या कर्करोगासाठी करण्यात येणाºया शस्त्रक्रियेच्या तुलनेत फुप्फुस टीबीची शस्त्रक्रिया करणे खूप कठीण असते.

Web Title:  Thoracoscopic surgery at Sewri Cancer Hospital, 30% of patients will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.