Join us

‘त्या’ विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी नंतर देता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:10 AM

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक सेलकडून आयोजित केली जाणारी एमएचटी सीईटी परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ...

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक सेलकडून आयोजित केली जाणारी एमएचटी सीईटी परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. मात्र याच दरम्यान अनेक उमेदवारांची बारावीची फेरपरीक्षाही आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटी देण्यात अडचण येणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटीच्या तारखेमध्ये बदल करून देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. संबंधित उमेदवारांनी दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र, मोबाइल क्रमांकासह महत्त्वाचा तपशील सीईटी कक्षाचा अधिकृत ईमेल आयडी technical.cetcell@gmail.com वर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------

तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी घोषित करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पूर्वी ज्या उमेदवारांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अंतर्गत अर्ज सादर केले आहेत अशा उमेदवारांचा गुणानुक्रम संबंधित नियम आणि गुणांच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराने संबंधित तपशील पडताळून घ्यावा. जर त्यात काही चूक असल्यास इ-स्क्रुटणीद्वारे शनिवार, १८ सप्टेंबरपर्यंत विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.