नैतिक पहारेकरी पोलिसांना ‘त्या’ जोडप्यांचे असहकार्य
By admin | Published: August 18, 2015 02:07 AM2015-08-18T02:07:16+5:302015-08-18T02:07:16+5:30
समाजात नैतिक पहारेकऱ्याची (मॉरल पोलिसिंग) भूमिका बजावणे अतिउत्साही पोलिसांच्या चांगलेच अंगलट आल्यानंतर आता गुन्हा दाखल झालेल्या जोडप्यांनी असहकाराची भूमिका घेतल्याने
डिप्पी वांकाणी, मुंबई
समाजात नैतिक पहारेकऱ्याची (मॉरल पोलिसिंग) भूमिका बजावणे अतिउत्साही पोलिसांच्या चांगलेच अंगलट आल्यानंतर आता गुन्हा दाखल झालेल्या जोडप्यांनी असहकाराची भूमिका घेतल्याने चौकशीतही अडथळा निर्माण झाला आहे. मढ बेटावर ६ आॅगस्ट रोजी पोलिसांनी छापा टाकून असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून १३ जोडप्यांवर गुन्हा दाखल केला होता. या जोडप्यांची चौकशी करणाऱ्या पोलिसांना या जोडप्यांनी संपर्क साधण्यासाठी खोटी माहिती दिली किंवा आपले म्हणणे नोंदवून घेतले जाऊ नये म्हणून हे नाही तर ते कारण सांगितले. पण त्या जोडप्यांचे म्हणणे ऐकून व नोंदवून घेतल्याशिवाय आम्हाला एकतर्फी अहवाल सादर करता येणार नाही, असे या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेच्या चौकशीवर देखरेख करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
मालवणी पोलिसांनी त्या भागातील ३ हॉटेल्सवर छापे टाकून ५४ गुन्हे नोंदविले. त्यातील ३८ गुन्हे सार्वजनिक ठिकाणी दारू प्याल्याचे, वेश्यांसाठी ग्राहक मिळविण्याचे तीन गुन्हे वेश्यावृत्ती प्रतिबंधक कायद्याखाली आणि १३ गुन्हे हॉटेल्समधील खोल्यांमध्ये असलेल्या जोडप्यांवर दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यावर सोशल मिडिया आणि समाजाच्या विविध थरांतून पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर या सगळ््या घटनेची चौकशी करण्याचा आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिला. अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंह पाटील यांना या चौकशीचे प्रमुख करण्यात आले व त्यांनी चौकशीचा अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आले. या सगळ््या घटनेत जोडपी केंद्रस्थानी आहेत. तुमचे म्हणणे नोंदवून घ्यायचे आहे असे आम्ही त्या जोडप्यांना सांगितले परंतु त्यातील बहुतेकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्या छापे कारवाईत तुम्हाला काय काय त्रास झाला याची माहिती आम्हाला द्या. तुमच्यावर हल्ला झाला का, पोलिसांनी तुम्हाला बळीचा बकरा बनविले का हे विचारण्यासाठी पोलिसांनी त्या जोडप्यांना आवाहन केले होते. या जोडप्यांना रस्त्यांवरून किंवा वसतिगृहांतून उचलण्यात आले होते का, छापा घालणाऱ्या पोलीस पथकाने त्यांना पोलीस ठाण्यात कसे बोलावले हा व इतर असा तपशील मागितला की ज्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करता येईल, असे हा अधिकारी म्हणाला.
बहुतेकांशी जोडप्यांशी संपर्क होत नाही. त्यापैकी अनेकांनी खोटेच पत्ते व दूरध्वनी क्रमांक दिले. ज्यांनी खरे दूरध्वनी क्रमांक दिले ते आम्हाला टाळत आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणतात की आम्ही बाहेरगावी आहोत किंवा खूपच व्यस्त आहोत म्हणून आम्ही त्यांचे म्हणणे नोंदवून घेऊ शकलेलो नाही, असे हा अधिकारी म्हणाला. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याकडून हंगामी अहवाल मिळू शकेल परंतु तपशिलासह अहवाल सादर करता येणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.