Nitesh Rane: ...तर पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावणारे घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:48 PM2022-09-24T13:48:15+5:302022-09-24T13:48:44+5:30

Nitesh Rane: पीएफआयवर झालेल्या कारवाईविरोधात पुण्यात झालेल्या आंदोलनादरम्यान, पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर नितेश राणे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

...Those raising slogans of Pakistan Zindabad will not go home, warns Nitesh Rane | Nitesh Rane: ...तर पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावणारे घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane: ...तर पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावणारे घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचा इशारा

googlenewsNext

मुंबई - एनआयए आणि अन्य केंद्रीय यंत्रणांनी धडाकेबाज कारवाई करत पीएफआय या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात पुण्यात झालेल्या आंदोलनादरम्यान, पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या व्हिडीओविरोधात भाजपा आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना यापुढे कोणीही आमच्या महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असा इशारा दिला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आज राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार असल्याने आणि हिंदुत्ववादी गृहमंत्री असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही बारकाईने या गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. मात्र यापुढे कोणीही आमच्या महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच आज आमचं सरकार आहे गरज भासली तर रस्त्यावर उतरू गरज भासली तर घरात घुसू, असा इशारा देत नितेश राणे यांनी भविष्यात तोंडात पाकिस्तानचं नाव येता कामा नये अशी कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी केली. 

 नितेश राणे पुढे म्हणाले की, या संघटना विविध पद्धतीने आपला देश आणि राज्य आपल्या ताब्यात कसा येईल, यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी इस्लामचं नाव घेतात. मुस्लिम तरुणांना वापरतात. त्यांना आधार कार्ड काढून देतात.धर्मांतराचे विषय वापरतात. ड्र्ग्स आणि इतर गोष्टींचा वापर करतात. आपल्या देशामध्ये असलेला हिंदू समाज त्याचं नुकसान कसं करता येईल आणि त्यांचं राज्य कसं प्रस्थापित करता येईल. यासाठी पीएफआय नावाची संघटना सातत्याने काम करते, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

गेल्या दोन दिवसांपासून  यांच्या संघटनेवर मोठ्या प्रमाणात जी कारवाई झालीय. त्यानंतर पुण्यामध्ये पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी जी हिंमत केलीय. पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिलेत. त्यांच्या काही विशिष्ट्य घोषणा दिल्यात. ही त्यांनी दाखवलेली हिंमत आहे. यांची पाळंमुळं समाजामध्ये किती खोलवर रुजलेली आहेत. याचं उत्तम उदाहरण आज पुण्यात दिसलंय. म्हणून पुण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

Web Title: ...Those raising slogans of Pakistan Zindabad will not go home, warns Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.