त्या विशेष मुलांसाठी त्यांचा रोज ४ किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 06:46 PM2020-05-06T18:46:14+5:302020-05-06T18:46:41+5:30

लॉकडाऊनच्या ठिकाणी इंटरनेट नसल्याने समुपदेशनासाठी रोज पायपीट

For those special children, their daily journey is 4 km | त्या विशेष मुलांसाठी त्यांचा रोज ४ किमीचा प्रवास

त्या विशेष मुलांसाठी त्यांचा रोज ४ किमीचा प्रवास

Next


सीमा महांगडे

मुंबई : अलिबागमध्ये ते लॉकडाऊन झाले आहेत मात्र ते राहत असलेल्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे अलिबागच्या महाळूनगे गावाहून तब्ब्ल ४ किमी अंतरावर असलेल्या बोरली या गावात जिथे इंटरनेट सेवा आहे तिथे ते रोज येतात आणि स्वमग्न मुलांच्या पालकांना आणि मुलांना समुपदेशन करतात. संचारबंदीमुळे  संचारबंदीमुळे आपल्या सर्वांप्रमाणे स्वमग्न मुलं आणि त्यांचे पालकही घरातच बंदित झाले आहेत. सक्तीने घरात बसून स्वमग्न मुलं तसंच त्यांच्या पालकांची चीडचीड होते किंवा इतरही एखाद्या कारणाने त्यांना नव्या मानसिक तणावांना- आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत स्वतः एका अनोळखी ठिकाणी लॉक डाऊन झालेले डॉ सुमित शिंदे या पालकांच्या ऑनलाईन समुपदेशनसाठी आणि सेशन्ससाठी रोज तब्ब्ल ४ कोलिमीटरचा प्रवास करतात आणि लेक्चर्स घेतात.

स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. त्यांच्या मनातील अनाकलनीय चिंता, नकारात्मक वर्तवणूक, असंतुलित सामाजिक व्यवहार आणि संवाद साधता न येणे त्यामुळेच अशा मुलांच्या पालकांना या लॉकडाउनच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना अशावेळी योग्य मार्गदर्शन व सल्ल्याची आवश्यकता असल्याने चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि चाईल्ड रिऍक्ट फाऊंडेशनचे डॉ सुमित शिंदे स्वतः मुंबईपासून काहीशे किलोमीटर दूर असलेल्या अलिबागमध्ये स्वतः अडकलेले असताना रोज ४ किमी चा प्रवास करून समुपदेशनसाठी सेशन्स घेतात. तिथून ते स्काइपद्वारे मुलांना आणि पालकांना समुपदेशन व मार्गदर्शन करतात.

सुमित शिंदे यांच्यासह त्यांच्या संस्थेचे आणखी १६ डॉक्टर , थेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक शहरातील विविध ठिकाणांहून स्वमग्न व लर्निंग डिऍबिलिटी असणाऱ्या मुलांचे , पालकांचे ऑनलाईन सेशन्स घेत आहेत. विविध व्हिडीओद्वारे या काळात या मुलांना कोणत्या प्रकारे समजून घ्यावे, गुणवुन ठेवावे याचे प्रशिक्षण देत आहेत. हे समुपदेशन केवळ शहरासाठी मर्यादित नसून हैद्राबाद , लखनऊ, दुबई, अमेरीका येथील भारतीय पालकांनाही हे समुपदेशन सुरु आहे.  आत्तापर्यंत समुपदेशनासाठीच्या हेल्पलाईनवर २०० हून अधिक पालकांचे प्रश्न आणि विविध मार्गदर्शनासाठी आल्याची माहिती डॉ सुमित शिंदे यांनी दिली.

 

सुमित यांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या बऱ्याचश्या संकल्पना प्रश्न याना योग्य दिशा मिळाली आहे. आमच्या मुलांमधील त्याच्या खेळण्याच्या गरजा, भावनिक संकल्पना समजावून सांगण्यास त्यांनी मदत केली. आम्हाला असे मार्गदर्शन आणि सल्ले मिळाले आहेत ज्यामुळे आमच्या मुलाला आम्ही त्याप्रमाणे गाईड केले तर त्याचे भविष्यही इतर मुलांप्रमाणेच असेल अशी आशा निर्माण झाली आहे.
- देवेश जगताप चे बाबा (अमेरिका)

 

Web Title: For those special children, their daily journey is 4 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.