मुंबई : मुंबई विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयातील क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि त्यामुळेच शैक्षणिक वर्षाची परीक्षा देऊ न शकणा-या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणाºया विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने सोमवारच्या विद्या परिषदेत (अकॅडेमिक कौन्सिलमध्ये) घेतला.मुंबई विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे महाविद्यालयीन, विद्यापीठ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये तसेच सांस्कृतिक स्पर्धा, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी हे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, आव्हान, इंटरनॅशनल युथ एक्सेंज प्रोग्राम अशा स्पर्धांमध्येही सहभागी होत असल्याने त्यांना परीक्षेस मुकावे लागते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ अथवा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना परीक्षांना मुकाव्या लागणाºया विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाºया या परीक्षेला बसतानापरीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचेही विद्या परिषदेत ठरविण्यात आले.या निर्णयाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन स्तरावरील सत्र एक ते चार तसेच पाचव्या आणि सहाव्या सत्रातील अप्लाईड कम्पोनेंटमधील विषयांच्या परीक्षा या महाविद्यालयात तर, कोअर कम्पोनेंटमधील विषयांच्या परीक्षा या विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जातील. नियोजित परीक्षा संपल्यानंतर तीस दिवसांच्या आत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही विद्या परिषदेत ठरविण्यात आले आहे.दरम्यान, विद्यार्थीहित लक्षात घेता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेचे आयोजन करावे, अशी मागणी युवासेनेकडून विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली होती. विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.>विद्यार्थी हिताला प्राधान्यमुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी हे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालय आणि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत असतात. अनेक विद्यार्थी त्यांच्या कलागुणांच्या जोरावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करतात. त्यामुळे महाविद्यालय आणि विद्यापीठाचेही नावलौकिक होते. अशा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच त्यांच्यासाठीपुन्हा परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय विद्या परिषदेत आम्ही घेतला आहे.- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा होणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:18 AM