‘त्या’ शिक्षकांना एक दिवस आधी पगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:58 AM2017-08-17T05:58:44+5:302017-08-17T05:58:46+5:30

मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेतच राहणार असल्याने त्यांचा पगारही शासनाकडून मुंबई बँकेत जमा होणार आहे.

'Those teachers' salary a day before! | ‘त्या’ शिक्षकांना एक दिवस आधी पगार!

‘त्या’ शिक्षकांना एक दिवस आधी पगार!

Next

मुंबई : मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेतच राहणार असल्याने त्यांचा पगारही शासनाकडून मुंबई बँकेत जमा होणार आहे. म्हणून ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत खाते उघडले आहे, त्यांना इतर शिक्षकांच्या एक दिवसअगोदर पगार मिळेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
दरेकर म्हणाले की, मुंबईतील सर्व शिक्षकांचे वेतन मुंबई बँकेतूनच होणार आहे. तरीही न्यायालयाच्या आदेशाचा पूर्णपणे विपर्यास करून वेतनाबाबत चुकीची माहिती देऊन काही संघटना शिक्षकांची दिशाभूल करत आहेत. ज्यांनी अद्याप मुंबई बँकेत खाते उघडलेले नाही, अशा केवळ २५ टक्के शिक्षकांना इतर शिक्षकांच्या एका दिवसानंतर पगार मिळेल. सणासुदीच्या काळात लवकर पगार मिळावा, यासाठी मुंबई बँकेतूनच ारटीजीएस/एनईएफटीद्वारे संबंधित शिक्षकांच्या शाळांच्या बँकेतील खात्यावर पगाराची रक्कम पाठविली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही व्यवस्था आॅगस्ट ते आॅक्टोबर या फक्त तीन महिन्यांसाठीच असल्याचे न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. हा अंतिम आदेश नसून, पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला आहे. त्यामुळे शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून नव्हे, तर मुंबई बँकेतूनच होणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत बँकेने ५८ कोटी रुपये पगार, तर शिक्षकांच्या कर्जासाठी २५ कोटींची रक्कम वितरित केली, असे स्पष्ट केले.
>शिक्षकांसाठी
गणपती कर्ज योजना
मुंबई बँकेत खाती असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी बँकेने गणपती स्पेशल लोन आॅफर सुरू केली आहे. त्यानुसार कर्मचाºयांना त्यांच्या पगाराइतके ओव्हरड्राफ्ट कर्ज त्वरित उपलब्ध केले जाणार आहे. या कर्जासाठी सवलतीच्या दरातील व्याजदर बँकेने दिला आहे. यासह अन्य अनेक योजना व सवलती बॅँकेने जाहीर केल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक डी. एस. कदम यांनी सांगितले.

Web Title: 'Those teachers' salary a day before!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.