मुंबई- नववर्षात स्कूल बस संघटनांनी आक्रमकतेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईसह नवी मुंबईत एकूण 1 हजारांपेक्षा अधिक शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये मुलांची ने-आण करण्यासाठी मुलुंड आणि वाशीसारख्या टोलनाक्यावर टोल द्यावा लागतो. त्या टोलमधून आम्हाला सूट द्या, अन्यथा दरवाढ करू, असा इशारा स्कूल बस ओनर्स असोसिएशननं दिला आहे. शाळांसोबत करार व परमिट नसणे, सुरक्षेसंबंधी उपाययोजना या गोष्टींचा समावेश नाही. मात्र स्कूल बस ओनर्स संघटना शासनाच्या नियमांप्रमाणे विद्यार्थ्यांची वाहतूक करते. बहुतांशी जीप, टेम्पो, ट्रॅव्हलर, मिनीबस यांच्यामधून अवैध विद्यार्थी वाहतूक होते, तीसुद्धा थांबली पाहिजे, अशी भूमिका स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतली आहे.शाळा व्यवस्थापन आणि अधिकृत वाहतूकदारांकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी अवैध वाहतूकदारांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशा वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन सचिव, परिवहन आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) यांना पत्र देण्यात आले होते. या पत्राची प्रत वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्यासह सर्व प्रादेशिक परिवहन आयुक्तांनाही देण्यातही आली होती. अवैध विद्यार्थी वाहतूकदारांवर कारवाई न झाल्यास बेमुदत संपाचाही इशारा देण्यात आला होता.> तेरा हजार परमिटवाहतूक आयुक्त कार्यालयाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार १३ हजार ७४८ स्कूल व्हॅनला परमिट देण्यात आले आहे. मात्र मुंबईतील ७६ शाळांचा सर्व्हे केला असता, येथील एकूण स्कूल व्हॅनची संख्या २९ हजार ४४० इतकी असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तर राज्यात स्कूल व्हॅनची संख्या दीड लाखाहून अधिक आहे.
'त्या' टोलमधून सूट द्या अन्यथा दरवाढ करू, स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 8:34 AM