Join us

‘त्या’ अनधिकृत शाळांना मान्यता मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:43 AM

मुंबई महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या २१६ अनधिकृत शाळांना मान्यतेबाबतचे निकष पूर्ण करून त्यांना मान्यता देण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

मुंबई - मुंबई महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या २१६ अनधिकृत शाळांना मान्यतेबाबतचे निकष पूर्ण करून त्यांना मान्यता देण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक मंच या संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच तावडे यांची भेट घेतली त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली.भाऊ कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने तावडे यांची भेट घेऊन त्यांचे शिक्षण संस्थांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. तावडे यांनी या समस्यांची माहिती घेतली व त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात प्रमोद मोरजकर, भालचंद्र दळवी, डॉ. मारुती पाचपुते यांचा समावेश होता. शिक्षण संस्थाचालकांच्या समस्यांबाबत संघटना करत असलेल्या कार्याचे तावडे यांनी कौतुक केले. संघटनेच्या वतीने संस्थाचालकांसमोरीलविविध प्रश्न व समस्यांबाबतचे सविस्तर निवेदन तावडे यांनादेण्यात आले.

टॅग्स :शाळाबातम्या