चैत्यभूमीच्या गर्दीत हरवलेल्यांना सापडणार वाट
By Admin | Published: December 6, 2014 12:56 AM2014-12-06T00:56:40+5:302014-12-06T00:56:40+5:30
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळलेल्या अनुयायांच्या गर्दीत अनेकांची कुटुंबीयांशी ताटातूट होत
मुंबई : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळलेल्या अनुयायांच्या गर्दीत अनेकांची कुटुंबीयांशी ताटातूट होत असते़ याबाबत आतापर्यंत नियंत्रण कक्षावर माहिती देऊन अनुयायांची मदत केली जात होती़ मात्र या वेळेस पहिल्यांदाच आकाशात दिशादर्शक बलून सोडून अनुयायांना शोधण्याचा प्रयत्न होणार आहे़
डॉ़ आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी दाखल झाले आहेत़ त्यानिमित्त शिवाजी पार्कवर पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचे प्रकाशन आज करण्यात आले़ या वेळेस हरविलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांसाठी मुंबईचे रस्ते नवीन असतात़ त्यातून अनेकांची चुकामूक होते़ त्यांना आपल्या तंबूपर्यंत पोहोचता यावे यासाठी मार्ग दर्शविणारा फुगा आकाशात सोडण्यात येणार असल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)