पाठराखण करणारेच पोलिसांची बदनामी करत आहेत : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:39+5:302021-03-16T04:07:39+5:30

मुंबई : जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा खून कुणी केला याबाबत खुलासा होत नाही तोपर्यंत ...

Those who follow are defaming the police: Devendra Fadnavis | पाठराखण करणारेच पोलिसांची बदनामी करत आहेत : देवेंद्र फडणवीस

पाठराखण करणारेच पोलिसांची बदनामी करत आहेत : देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा खून कुणी केला याबाबत खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण लावून धरू. हा मुंबई पोलिसांना विरोध नाही. पण मुंबई पोलिसात काही लोक अशा प्रकारे वागत असतील तर त्यांना फुले द्यायची का? त्यांची पाठराखण करत असतील तर तेच खऱ्या अर्थाने मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उत्तर मुंबईत भाजपच्या उत्तर मुंबई मोर्चाच्या वतीने आयोजित ‘चौपाल’ या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठिकठिकाणी चौपाल कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. कार्यक्रमात फडणवीस यांनी शिवसेनेच्या राज्यातील आणि पालिकेतील कारभारावर जोरदार टीका केली. पोलीस अधिकारी खून करतात, स्फोटक असणाऱ्या गाड्या ठेवतात, यांना पाठीशी घालणारे कोण आहेत, असा प्रश्न करतानाच अशा अधिकाऱ्यांना कोण सांभाळतंय, त्यांना कोणी परत आणले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील, असेही फडणवीस म्हणाले.

पालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. सत्ताधारी शिवसेनेने पालिकेला कंगाल बनविले आहे. नसानसांत भिणलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी पालिकेत सत्तापरिवर्तन घडवावे लागणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली २० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची तयारी केली जात आहे. मात्र, हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

पवार इतके दिवस कुठे होते?

शरद पवार किंवा प्रमुख नेते का बोलत नाहीत? राष्ट्रवादी-शिवसेनेकडून फक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त बातम्या पसरविल्या जात आहेत. कोण नाराज आहे आणि कोण काय करतंय यावरून काहीच फरक पडत नाही. नाराज असणारे एवढ्या दिवस कुठं होते. एवढे खुलासे होऊनही अजून जे बाजू घेत आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Those who follow are defaming the police: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.