मुंबई : गणेशोत्सव, नवरात्राेत्सव वेळी मूर्ती तयार करुन विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप बांधण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयातून परवानगी दिली जाणार आहे. मात्र तयार मूर्ती विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे.
मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आनंद साजरा केला जातो. या उत्सवाच्या काही महिन्यांआधीच मंडप बांधून मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करीत असतात. मात्र मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असल्याने सर्व उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विभागांमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.
मात्र या मूर्तिकारांना मंडप बांधणे आधी महापालिकेचा स्थानिक विभाग करण्याची परवानगी घ्यावी लागते. गत वर्षाप्रमाणेच यंदा देखील ऑनलाईन पद्धतीने ही परवानगी देण्यात येणार आहे. मात्र या परवानग्या स्वतः मूर्ती तयार करुन विक्री करणाऱ्या मूर्तिकारांनाच देण्यात येणार आहेत. तर तयार मूर्ती बाहेरुन आणून फक्त विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी आगारांना मनाई करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मूर्तिकारांना मंडपाकरिता परवानगी देण्यासाठी सन २०२१ करीता लागू असलेल्या शुल्क बाबतचे परिपत्रक पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis या लिंकवर हे परिपत्रक उपलब्ध आहे..