‘त्या’ उत्तरपत्रिका बोर्ड तपासणार

By admin | Published: April 20, 2017 05:03 AM2017-04-20T05:03:34+5:302017-04-20T05:03:34+5:30

दहिसर येथील इस्त्रा शाळेतून चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी आता वाशी येथील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयात होणार आहे.

'Those' will be able to check the answer sheet board | ‘त्या’ उत्तरपत्रिका बोर्ड तपासणार

‘त्या’ उत्तरपत्रिका बोर्ड तपासणार

Next

मुंबई : दहिसर येथील इस्त्रा शाळेतून चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी आता वाशी येथील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयात होणार आहे.
पोलिसांना मिळालेल्या ३१६ उत्तरपत्रिकांमध्ये काही छेडछाड झाली आहे का, याची कसून तपासणी करण्यात येणार आहे. शाळेच्या शिक्षकांकडून या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी दहिसर येथील इस्त्रा शाळेतून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. पोलिसांना तपासात ३१६ उत्तरपत्रिका सापडल्या आहेत. उर्वरित १०० उत्तरपत्रिकांचा शोध पोलीस घेत आहेत. सापडलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी बोर्डाकडून होईल. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचे वाशी कार्यालयातच मूल्यांकन होईल. तिथेच शिक्षकांना बोलावून मूल्यांकन होणार असल्याचे बोर्डाचे मुंबई अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Those' will be able to check the answer sheet board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.