Join us  

‘त्या’ चौघांची पोलीस करणार लवकरच चौकशी

By admin | Published: November 05, 2015 12:43 AM

परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाइड नोट’मुळे भूमिगत झालेल्या नगरसेवक सुधाकर चव्हाण, ठामपाचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष नजीब

- जितेंद्र कालेकर,  ठाणेपरमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाइड नोट’मुळे भूमिगत झालेल्या नगरसेवक सुधाकर चव्हाण, ठामपाचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण या चौघांनाही मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. असे असले तरी त्यांची येत्या दोन ते तीन दिवसांत तपास पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. या चौघांपैकी सुधाकर चव्हाणवगळता इतरांचे फोन अद्यापही नॉट रिचेबल आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी-शर्तींवरच या चौघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांचे पासपोर्ट आणि मोबाइल हे तपास पथकाकडे जमा करावे लागणार आहेत. तसेच पालिकेतही येण्यास मज्जाव केला आहे. अर्थात, न्यायालयाकडून तूर्त दिलासा मिळाला असला तरी त्यांना कासारवडवली पोलीस किंवा तपास पथकाकडे हजेरी लावावी लागणार आहे. या चौघांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, विक्रांत यांच्या मोबाइलवर रिंग जात होती. मात्र, फोन त्यांनी फोन उचलला नाही. जगदाळे आणि मुल्ला यांचे फोन लागले नाहीच. सुधाकर चव्हाणांचा फोन लागला. थोड्या वेळाने बोलतो, इतकेच ते बोलले. या चारही नगरसेवकांच्या कार्यालयांवर फारशी गर्दी नव्हती. तर, चौघांच्याही कार्यालयांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांचा तपशील हा तपासाचा भाग असल्यामुळे तो आताच उघड करणे उचित होणार नसल्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. चौघांची दोन-तीन दिवसांत चौकशी केली जाईल, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. महापालिकेत धास्ती, पोलीस आक्रमकपरमार प्रकरणामुळे काही नगरसेवक आक्रमक तर काहींनी चांगलीच धास्ती घेतली आहे. ज्या नगरसेवकांचा यात कोणताही संबंध नसताना त्यांना ‘पोलिसांनी तपासकामात सहकार्य करा’, असे सांगितल्यावर ते आक्रमक होत आहेत. तर, या प्रकरणात पोलिसांनी पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केल्याने आपलीही चौकशी होईल की काय, या चर्चेने काहींमध्ये तपास पथकाची धास्ती असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.- या चौघांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता फक्त सुधाकर चव्हाणांचा फोन लागला. थोड्या वेळाने बोलतो, इतकेच ते बोलले.